एक्स्प्लोर
जेजुरीजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला टँकरची धडक, 4 ऊसतोड मजुरांचा मृत्यू
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड कामगार सातारा जिल्ह्यातील लोणंदमध्ये ऊसतोडीसाठी आले होते.

पुणे : ट्रॅक्टर ट्रॉली आणि टँकरच्या अपघातात चार ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जेजुरी जवळील पिंपरे गावच्या हद्दीतील ही घटना आहे. एकूण 9 जण आणखी जखमी असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड कामगार सातारा जिल्ह्यातील लोणंदमध्ये ऊसतोडीसाठी आले होते. मात्र आज मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर जेजुरी गडावर दर्शनासाठी जाताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. मकरसंक्रांतीनिमित्त हे सर्व ऊसतोड मजूर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून जेजुरीला जात होते. दर्शन घेऊन परतत असताना या ट्रॉलीला टँकरने धडक दिली, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले आहेत.
आणखी वाचा























