Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 02 मे 2022 : सोमवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. लाऊडस्पीकर उतरवा अन्यथा 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंचा अल्टिमेटम, मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचाही इशारा
2. शरद पवारांना हिंदू शब्दाची अॅलर्जी, राज ठाकरेंचा हल्लाबोल, पवार आणि राष्ट्रवादी जातीय विष पसरवत असल्याचाही आरोप
3. राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लीम समाजानं प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, इम्तियाज जलील यांचं आवाहन तर पोलिसांनी राज ठाकरेंवर कारवाई करावी, आपची मागणी
4. दोन ठाकरेंच्या भांडणात देशातल्या मुस्लिमांना त्रास, खासदार असदुद्दीन ओवेसींची खंत, राज ठाकरेंप्रमाणेच महाराष्ट्रभरात सभा घेणार असल्याची ओवेसींची घोषणा
5. भोंगे उतरवण्याची हिंमत नाही आणि बाबरी पाडली म्हणतात, भाजपच्या बूस्टर डोस सभेत फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही शिवसेनेवर सडकून टीका
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 02 मे 2022 : सोमवार
6. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ महाराष्ट्राने पाहिलाय; लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला, भोंगाबंदी देशभर का नाही, ठाकरेंचा सवाल
7. राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा आज फैसला, राणांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालय निर्णय देणार, राजद्रोहाच्या आरोपाखाली राणा दाम्पत्याचा 9 दिवस न्यायालयीन कोठडीत मुक्काम
8. गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन ठाणे सत्र न्यायालयानं फेटाळला, अटकेची कारवाई होणार? उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता
भाजप (BJP) नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नेरुळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्ह्यात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयानं गणेश नाईकांचा जामीन नाकारल्यानंतर कोणत्याही क्षणी त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.
भाजप नेते गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाणे सत्र न्यायालयाने (Thane District & Sessions Court) नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते. बेलापूर आणि नेरुळ इथे दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी याचिका गणेश नाईक यांनी दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयानं निकाल आजसाठी राखून ठेवला होता. दरम्यान आज न्यायालयानं दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन नाकारला आहे.
9. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना पत्र, 'राष्ट्रीय कृती आराखडा' तयार करण्याचं आवाहन
10. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या युरोप दौऱ्यावर रवाना, सकाळी 9.30 वाजता बर्लिनमध्ये पोहोचणार, संध्याकाळी उद्योगपती आणि स्थानिक भारतीय नागरिकांशी संवाद साधणार