Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 06 मे 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
मान्सून यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, मान्सूनसाठी अंदमानच्या समुद्रात अनुकूल वातावरण, उकाड्याने हैराण नागरिकांसाठी खूशखबर
धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत पोलीस लवकरच धोरण ठरवणार, पोलीस महासंचालकांच्या बैठकीत धोरणाबाबत चर्चा, सूत्रांची माहिती
अयोध्येत येण्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांची मागणी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नसल्याचाही इशारा
कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या शताब्दी वर्षानिमित्त आज कार्यक्रम, 100 सेकंद स्तब्ध राहून लोकराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार
परभणीत 26 लाखांचा डांबर घोटाळा; आमदारांची पुराव्यानिशी तक्रार, फसवणुकीचा गुन्हा दाखल
Parbhani News : कंत्राटदाराने शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून 26 लाखांचा डांबर घोटाळा केल्याची पुराव्यानिशी तक्रार औरंगाबादच्या गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी परभणीत दिली असून त्यांच्या तक्रारीवरून स्थानिक कंत्राटदार आणि 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट चलनाद्वारे खरेदी
परभणीत 2011 ते 2013 दरम्यान दैठणा-माळसोना-वझुर-देवळगांव दुधाटे या 1 कोटी 19 लाख 119 रूपये रस्ता बांधकाम कामकाजाचे कंत्राट मे. पल्लवी कंट्राक्शनचे कंत्राटदार एस. जी. पाटील यांना मिळाले होते. कंत्राटदार यांना या रस्त्याच्या बांधकामासाठी लागणारे डांबर हे निविदेतील अटी प्रमाणे अधिकृत शासकीय रिफायनरीतून खरेदी करावयाचे होते. परंतु त्यांनी हिंन्दुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेड या नावाने चलनादवारे खरेदी केल्याचे भासवुन बनावट तसेच खोटे चलन त्यांनी तयार केले व कार्यकारी अभियंता परभणी यांच्याकडे खरे असे भासवून दाखल करून शासनाची अंदाजे 26 लाख 44 हजार रूपयांची आर्थिक फसवणुक केली आहे. तसेच मोजमाप पुस्तिका क्र 4517 ही या आर्थिक फसवणुकीचा महत्वाचा पुरावा असून सदर पुरावा हा नष्ट करण्यासाठी मे पल्लवी कंट्रक्शनचे कंत्राटदार एस.जी.पाटील (रा.परभणी) याने संगणमताने जाणीवपूर्वक चोरी केली आहे.
स्वतः आमदारांची पुराव्यानिशी तक्रार
संबंधित विभागाकडुन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही होत नसल्याने स्वतः आमदार प्रशांत बंब यांनी मे पल्लवी कंट्राक्शनचे कंत्राटदार एस जी पाटील रा.परभणी तसेच तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंता,शाखा अभियंता सार्वजनि बांधकाम विभाग परभणी यांनी रस्त्याच्या कामातील डांबराचे 26 लाख 44 हजार रुपये उचलून फसवणूक केल्याप्रकरणी मे पल्लवी कंस्ट्रक्शनचे कंत्राटदार एस.जी. पाटील तसेच तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्या विरोधात नानल पेठ पोलीस ठाण्यात आमदार प्रशांत बंब यांच्या तक्रारी वरून भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 420, 418, 466, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कोरेगाव भीमा हिंसाचाराला तत्कालीन सरकार जबाबदार', हिंसाचार पोलिसांचं अपयश, आयोगासमोर शरद पवारांची साक्ष
राज्यात इचलकरंजी २८ वी महानगरपालिका.. नव्या महापालिकेची राज्य सरकारकडून घोषणा, खासदार धैर्यशील माने यांना राज्य सरकारकडून मान्यतेचं पत्र
भारतात ४७ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू, जागतिक आरोग्य संघटनेचा अहवालातून दावा, भारताकडून आकडेवारीवर सवाल
केदारनाथाचे दरवाजे उघडले, 2 वर्षाच्या कोरोना संकटानंतर केदारनाथ यात्रेचा उत्साह, कडाक्याच्या थंडीतही भाविकांची गर्दी
निकोलस पूरनची विस्फोटक खेळी व्यर्थ, दिल्लीचा हैदराबादवर 21 धावांनी विजय