Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 06 ऑक्टोबर 2022 : गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. जबाबदारी दिली ते कटप्पा निघाले, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात, मविआ सरकारमध्ये शपथ घेताना गप्प का राहिलात? शिंदेंना सवाल तर भाजपवरही निशाणा
2. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप, आनंद दिघेंचे पाय कापणारे हेच, दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंकडून संपत्तीबाबत चौकशी, शिंदेंचा आरोप
3. मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळाव्यात जयदेव, स्मिता आणि निहार ठाकरे यांचा सहभाग, एकनाथला एकटं पाडू नका, जयदेव ठाकरेंचं आवाहन, निहार आणि स्मिता ठाकरेंनाही व्यासपीठावर मानाची खुर्ची
4. शिंदेंच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यात 9 ऑक्टोबरला ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा, उद्धव ठाकरे मात्र सहभागी होणार नाहीत
5. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आज सोनिया गांधी सहभागी होणार, दीर्घकाळानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 06 ऑक्टोबर 2022 : गुरुवार
6. मुकेश अंबानी आणि नीता अंबानींना जीवे मारण्याची धमकी, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये अज्ञात व्यक्तीचा धमकीचा फोन, पोलिसांकडून तपास
7 . हरियाणात रावणाचा जळता पुतळा नागरिकांच्या अंगावर कोसळला, अपघातात काही नागरिक जखमी, यमुनानगर येथील रावण दहनावेळी दुर्घटना
8. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनादिवशी मोठी दुर्घटना; अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरुच
9. किडनी दुखापत आणि गॅम्बियामधील 66 मुलांचा मृत्यू, भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध WHO कडून अलर्ट जारी
भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध डब्ल्यूएचओकडून (WHO) अलर्ट जारी करण्यात आलाय. WHO ने मेडेन फार्मास्युटिकल्स ऑफ इंडियाने बनवलेल्या खोकला आणि सर्दी सिरपवर वैद्यकीय उत्पादन अलर्ट जारी केला आहे. डब्ल्यूएचओने किडनीच्या दुखापतींशी आणि गॅम्बियामधील 66 मुलांच्या मृत्यूवरून हा अलर्ट जारी केलाय. रॉयटर्सने डब्ल्यूएचओच्या हवाल्याने सांगितले की, कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत पुढील तपास केला जात आहे.
मेडेन फार्मास्युटिकल्स ऑफ इंडियाने बनवलेल्या चार उत्पादनांपैकी प्रत्येकाच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणाने खाक्षी केली की त्यामध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची अस्वीकार्य मात्रा असल्याचे WHO ने वैद्यकीय उत्पादनाच्या अलर्टमध्ये म्हटले आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी याबाबत सांगितले की, डब्ल्यूएचओने आज गांबियामध्ये गंभीर मूत्रपिंडाच्या दुखापती आणि मुलांमधील 66 मृत्यूंशी संबंधित असलेल्या चार दूषित औषधांसाठी वैद्यकीय उत्पादन अलर्ट जारी केला आहे. या मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
10. आजपासून टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय सामन्यांची मालिका, लखनौमध्ये रंगणार पहिला सामना
भारतीय क्रिकेट संघानं (India National Cricket Team) आपल्या घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 2-1 असा पराभव केला. आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (6 ऑक्टोबर) लखनौच्या इकाना इंटरनॅशनल स्टेडियमवर (Ekana Cricket Stadium) होणार आहे.
हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र खेळणार नसून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा आता थेट टी-20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहे, तर शिखर धवन विश्वचषकात खेळणार नाही.