एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 30 सप्टेंबर 2022 : शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.कर्जावरचे व्याजदर तिसऱ्यांदा वाढण्याच्या शक्यतेनं सामान्यांची धाकधूक वाढली, आरबीआयच्या पतधोरणाकडे अर्थजगताचं लक्ष
 
2. जाता जाता पुढचे चार दिवस पाऊस वीजांच्या कडकडाटासह बरसणार, काल पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपलं
 
3. राजकारणामुळे बहीण भावाचं नातं संपुष्टात, परिणाम लक्षात घेऊन वक्तव्य करण्याचा धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
 
4. राज्यभर 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शिंदेंचा बालेकिल्ला ठाणे महापालिकेत अभिजीत बांगर आयुक्तपदी, मर्जीतल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदं मिळाल्याची चर्चा

Maharashtra IAS Transfers: राज्यात काल एकाचवेळी 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS Transfers) बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर (Manisha Mhaiskar) यांची मंत्रालयात प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मराठी भाषा विभागाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेत (Thane Mahapalika) आयुक्त म्हणून अभिजीत बांगर (Abhijit Bangar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Kaustubh Diwegaonkar) यांची बदली करण्यात आली आहे. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांची मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती. दिवेगावकरांची बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण विकास विभागात बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांची राष्ट्रीय हेल्थ मिशनच्या आयुक्त तथा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रवीण दराडे यांची नियुक्ती पर्यावरण विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे,ते आधी राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ते आधी चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी होते.

नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांची ठाण्याच्या आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

5.काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिग्विजय सिंह, शशी थरुर यांच्यासह कोण अर्ज भरणार याची उत्सुकता, राजस्थान मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा गहलोत-पायलट यांच्यात रस्सीखेच

6. नाना पटोले यांच्याकडून राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्रांशी! म्हणाले भारत जोडो यात्रा ही रामाच्या वनवासाप्रमाणेच

7.बेस्टकडून संपूर्ण मुंबईत ई-बाईक सेवेची घोषणा,  ऑक्टोबरपासून मुंबईतील 180 बस थांब्यांसह विविध ठिकाणी 1000 ई-बाईक उपलब्ध होणार 

8. राज्य सरकारचं गिफ्ट;  BMC,बेस्टचे कर्मचारी, शिक्षक यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर

9.विकास नको पण आराखडा आवरा! पंढरपूरमध्ये सध्या न मंजूर झालेल्या आराखड्यावर रणकंदन 

10. 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज होणार संपन्न;  सुरूराई पोट्रूला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget