Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 25 ऑक्टोबर 2022 : मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. नक्षलींशी दोन हात करणाऱ्या जवानांसोबत मुख्यमंत्री दिवाळी साजरी करणार, एकनाथ शिंदे आज गडचिरोलीतल्या भामरागड दौऱ्यावर
2. औरंगाबादमध्ये फटाके फोडताना 16 मुलं जखमी, चेहरा आणि डोळ्यांना इजा, घाटी रुग्णालयात उपचार सुरु
गेल्या दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी देशभरात साजरी करण्यात आली. त्यामुळे सर्वच ठिकाणी दिवळाचा उत्साह पाहायला मिळाला. तर लक्ष्मीपूजनाला औरंगाबादकरांनी फटाके फोडण्याचा मनसोक्त आनंद घेतला. मात्र याचवेळी शहरात घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेत 16 जणांना इजा झाल्याने ते जखमी झाले आहेत. तर औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात 6 मुलांवर उपचार सुरु असल्याचे देखील समोर आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली आहे. यावेळी लहान मुलांपासून तर मोठ्यांपपर्यत सर्वांनीच फटाके फोडून दिवाळी साजरी केली. पण याचवेळी औरंगाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काही दुर्घटना घडल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे सकाळपर्यंत एकूण 16 जण फटाके फोडताना भाजले असल्याचे समोर आले आहे. ज्यात 6 मुलांचा देखील समावेश आहे. यापैकी अनेकांवर औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ज्यात कुणाला हाताला तर कुणाच्या तोंडाला इजा झाली असल्याचे दिसून आले.
3. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे राज्यभरात ठिकठिकाणी अग्नितांडव, वसई-विरारमध्ये पाच दुर्घटना, यवतमाळमध्ये तीन दुकानं खाक
4. काचेच्या बाटलीत बॉम्ब फोडण्यास मनाई केल्याने एकाची हत्या, मुंबईतील गोवंडीमधील शिवाजीनगर भागातील धक्कादायक घटना, तीन अल्पवयीन मुलांचं कृत्य
5. अतिवृष्टीमुळे राज्यभरातला शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, मात्र सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरुच
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 25 ऑक्टोबर 2022 : मंगळवार
6. परतीच्या पावसाचा तडाखा बसलेल्या बळीराजाची दिवाळीही गोड करुयात, एबीपी माझाचं प्रेक्षकांना आवाहन, शेतकरी अजूनही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत
7. संध्याकाळी 4 वाजून 49 मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणाला प्रारंभ होणार, अंधश्रद्धेतून चुकीच्या प्रथा न पाळण्याचं अंनिसचं आवाहन
8. लसीकरण करूनही सांगलीत पाचशेहून अधिक जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव, पशूवैद्यकीय विभागासमोर मोठं आव्हान
9. सिडकोकडून घरांच्या लॉटरीचं 'गिफ्ट', 7 हजार 849 घरांसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ गृहप्रकल्प उभारणार
घर खरेदीसाठी अनेक जण दिवाळीचा (Diwali 2022) मुहूर्त साधतात आणि हाच दिवाळीचा मुहूर्त साधत सिडकोनं (CIDCO) नवी मुंबई (Navi Mumbai News) परिसरात 7 हजार 849 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. खारकोपर आणि बामणडोंगरी परिसरात ही घरं बांधली जाणार आहे. नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच हा गृहप्रकल्प असणार आहे.
10. भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होणार, 28 ऑक्टोबरला शपथविधी