Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 22 एप्रिल 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. राज्यात उष्णतेची लाट वाढत असताना पुन्हा एकदा भारनियमनाचे चटके, कोळसा आणि रेल्वे मंत्रालयाच्या असहकार्यामुळे वीजटंचाई, ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा आरोप
2. राज्य वीज संकटाचा सामना करत असताना राजकीय पक्षांच्या सभेत मात्र सर्रास वीज चोरी, नागपुरात संजय राऊतांच्या सभेतला प्रकार
3. आजपासून एसटी पूर्ण क्षमतेनं धावणार... एसटीचे 77 हजार कर्मचारी कामावर हजर, इतर कर्मचारी वैद्यकीय आणि इतर बाबी पूर्ण करून सोमवारी सेवेत रुजू होणार
ST Bus Service Resumed from Today : तब्बल 5 महिन्यांच्या ब्रेकनंतर आजपासून लालपरी पुन्हा एकदा सुसाट धावणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला अल्टिमेटम आज संपला असून आजपासून एसटीचे 77 हजारांहून अधिक कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. तर उर्वरित साडेचार हजार कर्मचारी चाचण्या पूर्ण करून उद्या कामावर रूजू होणार आहेत.
गेल्या पाच महिन्यांपासून राज्याची लालपरी आणि सर्वसामान्यांच्या एसटीची चाकं ठप्प होती. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी जवळपास दीडशे दिवस संप पुकारणारे कर्मचारी आजपासून कामावर रूजू होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कामगारांनी संप पुकारल्यानं (ST Strike) राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. दुर्गम भागात राहणारे नागरिक, विद्यार्थी यांना या संपाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांना, तसेच खासकरुन ग्रामीण भागातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
4. फडणवीस सुबुद्धीनं वागले असते तर आज राज्याचे मुख्यमंत्री असते, फडणवीसांच्या टीकेला नागपुरातून संजय राऊतांचं प्रत्युत्तर
5. औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा, दौलताबाद-पोटूळ दरम्यान ट्रेन थांबवून 8 ते 10 जणांकडून लूटमार
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 22 एप्रिल 2022
6. आजपासून लातूरच्या उदगिरमध्ये सारस्वतांचा मेळा, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण, राष्ट्रपती मात्र अनुपस्थित राहणार
7. भाजप आमदार गणेश नाईकांना अटक होण्याची शक्यता, अंतरिम जामीन नाकारला; नाईकांकडून आपल्या जीवाला धोका, पीडित महिलेचा आरोप
8. राज ठाकरेंच्या भोंग्याच्या अल्टिमेटमनंतर मुंबई पोलीस सतर्क, अनुचित प्रकार घडल्यास पोलीस पाच मिनिटात पोहोचणार, एसआरपीएफची 57 पथकं आणि सहा दंगल नियंत्रण पथकं तैनात
9. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं काळजी घ्या, मुख्यमंत्री ठाकरे यांचं जनतेला आवाहन, मुंबईत आढळलेल्या 91 रुग्णांपैकी 90 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत
10. काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सैन्यदलांची दहशतवाद्यांसोबत चकमक, 3 दहशतवाद्यांचा खात्मा तर जम्मूच्या सुजवा आर्मी कँपमधील चकमकीत एक जवान शहीद