Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 21 ऑगस्ट 2022 : रविवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. मोदी पर्व संपल्याची टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा पलटवार, मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा
2. ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॉयला मंत्रिपद, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ठाकरे पितापुत्रांवर टीका, शिवसेना-भाजपातील राजकीय महाभारतात अनेक नेत्यांची उडी
3. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खूषखबर, एसटी महामंडळाकडून यंदा कोकणात जाण्यासाठी 2 हजार 310 गाड्या सोडण्यात येणार
कोरोना महासाथीचे सावट दूर झाल्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होणार आहे. मुंबई व परिसरातील अनेक कोकणवासिय गणेशोत्सवात गावी जाणार आहेत. कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानेदेखील तयारी केली आहे. एसटीकडून गणेशोत्सवानिमित्त 2310 जादा बसेस (MSRTC Extra Buses) सोडण्यात येणार आहेत.
4. निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये पुन्हा राजकीय उलथापालथ, दोन कॅबिनेट मंत्र्यांची खाती काढून घेतली
गुजरातमधील मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. गुजरातचे मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडून महसूल मंत्रालय आणि पूर्णेश मोदींकडून रस्ते आणि इमारत खात्याचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी महसूल खाते गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे आणि रस्ते आणि इमारत खाते जगदीश पांचाळ यांच्याकडे सोपवले आहे.
5. टिपू सुलतानची इंग्रजांविरोधात चार वेळा लढाई तर सावरकरांनी चार वेळा माफी मागितली, असदुद्दीन ओवेसींच्या वक्तव्याने नव्या वाद पेटण्याची शक्यता
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 21 ऑगस्ट 2022 : रविवार : एबीपी माझा
6. 'भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू, राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात 7 सप्टेंबरपासून यात्रेला सुरुवात
7. कोकणात फिरायला गेलेल्या वाशिममधल्या 6 तरुणांच्या कारला ताम्हिणी घाटात अपघात, खोल दरीत कार कोसळल्यानं तिघांचा मृत्यू, तीन जखमींना बाहेर काढण्यात यश
8. आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नावाने व्हॉट्सअॅप अकाऊंट बनवून पोलिसांनाच गंडा, तोतयाचा शोध घेण्याचं सायबर पोलिसांसमोर आव्हान
9. हिमाचलमध्ये ढगफुटी, २४ तासांत १९ जणांचा मृत्यू, उत्तराखंडमध्येही पावसाचा हाहाकार
10. झिम्बाब्वे विरुद्धची तीन एकदिवसीय सामन्याची मालिका भारतानं मालिका जिंकली; दुसऱ्या सामन्यात 5 विकेट्सनं विजय