Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 21 एप्रिल 2022 : गुरुवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
शनिवारी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार, राणा दाम्पत्याचा इशारा, शिवसेनाही चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
वकील गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार, तर सदावर्तेंच्या इमारतीच्या गच्चीवरील सीसीटीव्ही फुटेज माझाच्या हाती
दोन दिवसांनंतरही पोलखोल रथाच्या तोडफोड प्रकरणी अटक नाही, भाजप चेंबूर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणार, तर दहिसरमध्ये शिवसेनेनं पोलखोल सभेचा स्टेज हटवला
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेंची बदली, पिंपरीचे आयुक्त कृष्णप्रकाशही व्हीआयपी सुरक्षा विभागात
काजू आणि मोहाच्या फुलांपासून तयार होणाऱ्या दारुला विदेशी मद्याचा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आजपासून भारत दौऱ्यावर; आज अहमदाबादमध्ये उद्योजकांशी चर्चा, उद्या पंतप्रधानांशी भेट
Boris Johnson India Tour : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज 21 एप्रिलपासून भारत दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील. जॉन्सन आज गुजरातमधून आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील. आज ते अहमदाबादमध्ये उद्योजकांसोबत चर्चा करतील. उद्या 22 एप्रिल रोजी ते पंतप्रधान मोदी यांच्याशी दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्यातील शेवटची भेट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लासगो शिखर परिषदेदरम्यान झाली होती. गेल्या वर्षी पंतप्रधान जॉन्सन यांचा भारत दौरा दोनदा रद्द करण्यात आला होता. जानेवारीत ते पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र त्यावेळी देशातील कोरोना संकटामुळे हा दौरा शक्य झाला नाही. यानंतर एप्रिलमध्येही कोरोना संकटामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. G-7 चे अध्यक्ष या नात्याने ब्रिटनने पंतप्रधान मोदींना निमंत्रण दिले होते, पण कोरोना संकटामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा होऊ शकला नाही
विगमधून सोन्याची तस्करी, तब्बल 30 लाखांचा ऐवज जप्त, दिल्लीत सीमाशुल्क विभागानं तस्कराचा डाव उधळला
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टॉपवर; ऑरेंज आणि पर्पल कॅपवर राजस्थानचा कब्जा
पान मसाल्याच्या जाहिरातीनंतर खिलाडी अक्षय कुमारने मागितली चाहत्यांची माफी, सोशल मीडियावर माफीनामा