Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 20 एप्रिल 2022 : बुधवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या सभांना परवानगी देऊ नका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधानंतर वंचित बहुजन आघाडीचंही पोलिसांना पत्र
2. मुंबईत सकाळच्या अजानवेळी 72 टक्के भोंगे बंद, तर एरवीही आवाजाची पातळी कमी, पोलीस सूत्रांची माहिती, आज कॅबिनेटमध्ये नियमावलीवर चर्चेची शक्यता
3. प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसचे मंत्री आक्रमक भूमिका घेणार, आपआपल्या जिल्ह्यात संपर्क वाढवण्याचा सल्ला, हायकमांडकडे केलेल्या तक्रारीनंतर बैठकीत सूर
4. संजय राऊतांविरोधात वकिलांच्या संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, भाजपच्याच नेत्यांना दिलासा मिळत असल्याचा केला होता आरोप
5. वकील गुणरत्न सदावर्तेंच्या घरात पैसे मोजायची मशिन सापडल्याची पोलीस सूत्रांची माहिती, एसटी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या पैश्यातून मालमत्ता खरेदी केल्याचा संशय
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 20 एप्रिल 2022 : बुधवार
6. भाजप नेते गणेश नाईकांचा पोलिसांकडून शोध सुरु, बलात्काराच्या गुन्ह्यानंतर अटकेची टांगती तलवार कायम
भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं नवी मुंबई पोलिसांकडून भाजप आमदार गणेश नाईकांचा शोध सुरु आहे. गणेश नाईकांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. कोपरखैरणेमधलं घर, कार्यालय आणि मुरबाडमधल्या फार्महाऊसवर पोलिसांचं पथक गणेश नाईकांचा शोध घेणार आहेत. दरम्यान, गणेश नाईकांवर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले आहेत. दीपा चौहान असं या महिलेचं नाव असून त्यांनी यासंबंधित महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. याचीच दाखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
7. ऊठ मुंबईकर ऊठ, थांबव तुझी लूट, मुंबईतल्या सभेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची घोषणा, मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचीही टीका
8. जूनमध्ये येणाऱ्या वादळात ठाकरे सरकार कोसळणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा, शिवसेनेनं अनेक वादळं पचवल्याचा संजय राऊतांचा पलटवार
9. राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट, 21 आणि 22 एप्रिलला वादळी वाऱ्यांसह पाऊस, पिकांना फटका बसण्याची शक्यता
10. एसबीआयकडून गृह आणि वाहन कर्जाचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय, एमसीएलआर दरात वाढ केल्यानं हप्ता वाढणार तर आणखी 2 बँकांकडूनही व्याजदरवृद्धी