Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 16 एप्रिल 2022 : शनिवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हनुमान जयंतीला राजकीय रंग, राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचीही महाआरती, तर अमरावतीत युवक काँग्रेसकडून शोभायात्रेचं आयोजन
Raj Thackeray in pune : मशिदीवरील भोंगे न हटवल्यास हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देणारे राज ठाकरे येत्या हनुमान जयंतीला काय करणार याच्या चर्चा होत्या. आज हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुण्यात कालच पोहोचले आहेत. पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते ही महाआरती होणार आहे. एका अर्थी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधी आंदोलनाचा हा श्रीगणेशा असल्याचंच राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात राजगर्जना होणार आहे. दरम्यान जे पोस्टर मनसेनं बनवलं आहे त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करण्यात आला आहे.
2.हनुमान चालिसावरुन मुख्यमंत्र्यांना आव्हान देणाऱ्या रवी राणांना शिवसेनेचं प्रत्युत्तर, अमरावतीतल्या घराबाहेर स्पीकर लावून हनुमान चालिसाचं पठण
3. छेडोगे तो छोडेंगे नहीं म्हणत मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या मनसेच्या भूमिकेनंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा इशारा, संघटनेचा नेता मतीन शेखानीविरोधात गुन्हा
4. आज उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल, भाजपचे सत्यजीत कदम आणि मविआच्या जयश्री जाधव रिंगणात, कोल्हापुरातील मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
5.मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ गदग एक्स्प्रेसची पद्दुचेरी एक्स्प्रेसला धडक, जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत, घसरलेल्या तीन डब्यांपैकी दोन डबे हटवले
6. महाराष्ट्र कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त झाल्यानंतर मोठ्या उत्साहात जोतिबाची यात्रा, दोन वर्षांनंतर मानाच्या सासण काठ्या नाचवण्याचा योग, थेट जोतिबाच्या डोंगरावरुन माझाचं कव्हरेज
7. सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे सिंधुदुर्ग गजबजले, पर्यटकांची मोठी गर्दी
8. अनधिकृत मासेमारीवर होणार ड्रोनने टेहळणी, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडून तत्त्वत: मान्यता
9. कीव्हमध्ये 900 हून अधिक मृतदेहांचा खच, रशियन सैन्य माघारी परतल्यानंतरच वास्तव
10 राहुल त्रिपाठी-मार्करम यांची वादळी खेळी, हैदराबादचा कोलकात्यावर सात विकेटनं विजय