Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 12 मे 2022 : गुरुवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. महापालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यास परवानगी द्या, राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात केलेला अर्ज एबीपी माझाच्या हाती
Corporation Election: निवडणुका महाराष्ट्रात कधी होणार या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. आता याच संदर्भातली मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातल्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात राज्य निवडणूक आयोगाकडून अर्ज सादर करण्यात आला आहे. या अर्जात महापालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या, अशी विनंती करण्यात आली आहे. लवकरच या अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात निवडणुका नोटिफाय करा, असे आदेश दिले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात आपला हा अर्ज सादर केला आहे. निवडणूक आयोगाच्या अर्जानुसार, जून महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड रचना आणि इतर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करू, असं आयोगाने कोर्टात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. पण त्यानंतर पुढची प्रक्रिया ऐन पावसाळ्यात पूर्ण करावी लागेल. त्यात काय काय प्रशासकीय अडचणी आहेत, हे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. पावसाळ्यात मतदान झाल्यास मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते, अशी भीती देखील या अर्जात निवडणूक आयोगाकडून व्यक्त केली गेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आपल्या या अर्जात विनंती केली आहे की, सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यात महानगरपालिका आणि नगरपंचायत या निवडणुका घेण्याच्या परवानगी आम्हाला द्याव्यात. तसेच ऑक्टोबर महिन्यात ग्रामीण भागातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या परवानगी देण्याची विनंती केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोग लवकरच निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुनावणी करू शकते.
2. भाजप खासदार बृजभूषण यांच्या तीव्र विरोधानंतरही मनसेकडून अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी, मनसैनिकांना अयोध्येत नेण्यासाठी 11 ट्रेन्स बुक करणार
3. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार, रामदास आठवलेंची साद, रिपब्लिकनच्या छताखाली एकत्र येण्याचं आवाहन
4. खेळण्याच्या व्यापाऱ्याकडून 6 कोटींची खंडणी वसूल करणाऱ्या मुंब्र्यातील 10 पोलिसांचं निलंबन, तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ पोलीस अंमलदारांचा समावेश
5. ईडी अधिकाऱ्यांसाठी वसुलीचा आरोप: जितेंद्र नवलानी परदेशात फरार?, ACB कडून लूक आऊट नोटीस जारी
6.धामण घाटातील भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, बीडचे प्रसिद्ध व्यापारी टेकवाणी कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला
7.शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, लटकेंच्या निधनानं मतदारसंघात शोककळा
8. राज्य पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला होणार, वित्त-लेखा गट, उत्पादन शुल्क विभाग, बालविकास विभागाच्या 161 पदांसाठी भरती
9. ताजमहाल मुघलांचा नव्हे तर आमच्या पूर्वजांचा वारसा; राजस्थानच्या भाजप खासदार दिया कुमारींचा दावा
10. मार्श-वॉर्नर जोडी पडली राजस्थानवर भारी, दिल्लीचा 8 गडी राखून विजय, दिल्ली गुणतालिकेत पाचव्या स्थानावर