Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 11 जून 2022 : शनिवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. राज्यसभेच्या 6 पैकी 3 जागांवर भाजपचा तर 3 जागांवर मविआचा विजय, सहावी जागा भाजपच्याच खिशात, शिवसेनेच्या संजय पवारांवर महाडिकांचा दणदणीत विजय
Rajya Sabha Election Key Points : हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल हाती आला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा दणदणीत विजय झाला. तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांनीही विजयाचा गुलाल उधळला. राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली तयारी, त्यानंतर आकड्यांची गणितं, मग मतदान आणि त्या दरम्यान घेतलेले आक्षेप, आरोप-प्रत्यारोप आणि शेवटी लागलेला निकाल. हा सर्व घटनाक्रम अत्यंत उत्कंठावर्धक होता.
2. महाविकास आघाडीसोबतच्या 10 अपक्षांचं मतं फोडण्यात भाजपला यश, फडणवीसांकडून अप्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांचे आभार, तर राऊतांकडूनही अपक्ष फुटल्याची कबुली
3. संजय राऊतांपेक्षा भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराला अधिक मत, फडणवीसांचा टोला, तर आयोगावर दबाव टाकून भाजपचा विजय, राऊतांचा पलटवार
4.महाविकास आघाडीची मतं फुटली नाहीत, मतं कुठुन आली याची मला कल्पना, शरद पवार यांची प्रतिक्रिया
5. 'शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; तेलही गेले, तूपही गेले हाती धुपाटने राहिले'; निकालानंतर मनसेची खोचक ट्वीका
6. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेला धोबीपछाड दिल्यानंतर भाजपचं जोरदार सेलिब्रेशन, सकाळी ११ वाजता मुंबईत विजयोत्सव साजरा करणार
7. शिवसेनेच्या सुहास कांदे यांचं मत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाद, कांदेंनी मतपत्रिका शेजारील दुसऱ्या पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवल्याचा ठपका
8. ED चे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स, 23 जूनला हजर राहण्याचे आदेश
9. मान्सूनची कोकणात वर्दी, काही दिवसातच मान्सून महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता, मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पाऊस, पुण्यातही मुसळधार पाऊस
10. सोलापूर जिल्ह्यात नवीन राहण्यास येणाऱ्यांची माहिती द्यावी, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आवाहन