(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 07 एप्रिल 2022 : गुरुवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. INS विक्रांतसाठी गोळा केलेला निधी सोमय्या पिता-पुत्रांना महागात पडण्याची शक्यता, अपहाराच्या आरोपानंतर मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा
Kirit Somaiya : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) आणि इतर यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली.
काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट
कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर करण्यात आला आहे. माजी सौनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जातंय.
2. राऊतांच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून रॅलीचं आयोजन, ईडीच्या कारवाईविरोधात शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी, तर मोदी-पवार भेटीतही राऊतांवरच्या कारवाईवर चर्चा
3. ईडीचा कोकणाकडे मोर्चा, रिफायनरी होणाऱ्या भागातील जमिनीचे व्यवहार रडारवर, मविआतील बड्या नेत्याच्या भावासह नातेवाईकांची चौकशी
4. जेईईच्या परीक्षा पुढे ढकलल्या, 20 ते 29 जूनदरम्यान पहिलं सत्र तर 21 ते 30 जुलैदरम्यान दुसरं सत्र, NTEची माहिती
5. मुंबईत एक्स-ई व्हेरियंटचे रुग्ण सापडल्याचे सबळ पुरावे नाहीत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानं मोठा दिलासा
6. ऑर्केस्टा-डान्स बारमालकांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप, कधी गणवेशातच झोपतात तर नर्तक-गायकांचे फोटो काढतात
7. बीडमध्ये सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप
8. खरीप हंगाम 2022 साठी 52 लक्ष मेट्रिक टन खतांची केंद्राकडे मागणी, कृषीमंत्री दादाजी भुसेंची माहिती
9. सेल्फी काढताना तोल जाऊन गडावरुन दरीत पडल्यानं तरुणीचा मृत्यू, मुरबाडच्या गोरखगडावरील घटना
10 . केकेआरच्या पॅट कॅमिन्सनं काढली मुंबईच्या गोलंदाजांची पिसं, 14 चेंडूत ठोकलं अर्धशतक, मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव