Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 06 सप्टेंबर 2022 : मंगळवार : एबीपी माझा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. दसरा मेळाव्यात राज ठाकरेंच्या निमंत्रणाबाबत मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान, माझाच्या बाप्पाच्या दर्शनानंतर सांगितली सत्तांतराची इनसाईड स्टोरी, तर काँग्रेस नेत्यांचा शिंदेंवर पलटवार
2. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बारामतीत, पवारांच्या प्रचाराची सुरुवात होणाऱ्या मारुती मंदिरापासून दौऱ्याला सुरुवात
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत येऊन शरद पवारांना चॅलेंज दिलंय. बारामतीसह लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचं भाजपचं टार्गेट आहे असं बावनकुळे म्हणाले. या आधी अनेक गड उद्धवस्त झाल्याचं सूचक वक्तव्य बावनकुळेंनी केलंय. आज चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर आहेत. तर यापुढे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पाच ते सहा वेळा बारामतीत येणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली. एकीकडे काल अमित शाहांनी मुंबई दौऱ्यादरम्यान ठाकरेंना टार्गेट केलं. तर आता पवारांची बारामती देखील भाजपच्या निशाण्यावर आहे हे स्पष्ट झालंय.
3. मुंबई दौऱ्यात अमित शाहांचा शिवसेनेवर हल्लाबोल, धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जागा दाखवा, तर मुंबई महापालिकेत भाजपचं मिशन 150
4. मला जेलमध्ये टाकणाऱ्यांना अद्दल घडली, ये तो झांकी है, पिक्चर पुरी बाकी है, असं म्हणत खासदार नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5. हाफकीनसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन ट्रोल झाल्यानं आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा संताप, स्थानिक वृत्तपत्रात चुकीच्या बातम्या छापल्याचा आरोप
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 06 संप्टेंबर 2022 : मंगळवार
6. उस्मानाबादमधील साडेतीन लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 2022च्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना तीन आठवड्यात भरपाई द्या, सुप्रीम कोर्टाचे विमा कंपन्यांना आदेश
7. 2024च्या लोकसभा निवडणुकासाठी भाजपची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक, तर नितीश कुमारांची केजरीवाल आणि डाव्या नेत्यांसोबत गाठीभेटी
8. दिल्लीतील राजपथ लवकरच होणार कर्तव्यपथ, नाव बदलण्याचा मोदी सरकारचा निर्णय, काँग्रेस नेते मिलिंद देवरांकडून निर्णयाचं स्वागत
9. महेश भट्ट यांचं खरं नाव अस्लम, कंगना रनौतचा दावा, एवढं सुंदर नाव का लपवता? कंगनाचा खोचक सवाल
10. टी-20 आशिया चषकात टीम इंडियासाठी करो या मरोची स्थिती, आज श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकणं गरजेचं