Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 06 जून 2022 : सोमवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आखाती देशाकडून निषेध, भारतीय दूतावासाला समन्स, नुपूर शर्मा, नवीनकुमार जिंदाल यांची भाजपकडून हकालपट्टी
2. राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर जय्यत तयारी, शिवरायांच्या पुतळ्यावर होणार सुवर्णमुद्रांचा अभिषेक, ग्रामपंचायतींवर स्वराज्यध्वज उभारणार
शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होतोय. ध्वजपूजन, ध्वजारोहण करण्यात येणार असून रणवाद्यांच्या तालावर शिवरायांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातोय. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक केला जाणार आहे. यावेळी शिवाजीराजांचा पालखी सोहळाही आकर्षण असतो. शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यानिमित्तानं आज राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्याला अभिवादन केलं जाणार आहे. यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत गायनही केलं जाणार आहे.
3. राज्यात कोरोनाचा आकडा दीड हजाराच्या तर मुंबईत हजाराच्या उंबरठ्यावर, आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा
4. राज्यसभेच्या रणनीतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सेना आणि अपक्ष आमदारांशी चर्चा करणार, तर मतदानाचा हक्क मिळावा म्हणून अनिल देशमुख आणि नवाब मलिक कोर्टात
5. ...तर राज्यसभेसाठी अखेरच्या पाच मिनिटात मतदान करू; बच्चू कडू यांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा
6. सलमान खानचाही सिद्धू मुसेवाला करू, सलमान खानचे वडील सलीम खान यांना सापडलं धमकीचं पत्र, पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरु
7. गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार, कोरोना निर्बंधमुक्तीनंतर यंदा पालखी सोहळ्यात शेकडो भक्त उपस्थित राहणार
8.पालखी मार्गावर पाणी, आरोग्यासह स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अजित पवारांच्या सूचना
9.'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो'; मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य
10. पोटच्या मुलांनीच घेतला आईचा जीव, लग्नाला विरोध केल्यामुळं भाऊ अन् मैत्रिणीसह आईला संपवलं, मुंबईतील घटना