सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 01 ऑक्टोबर 2022 : शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. देशात आजपासून 5G क्रांती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ होणार, तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारताचा प्रवेश
2. महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छताचं पावसामुळे नुकसान
3. भारताच्या 2 बोटी पाकिस्तानच्या ताब्यात; बोटींवरील 16 खलाशांना अटक, 7 जण पालघर जिल्ह्यातील, खलाशांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू
खोल समुद्रात मासेमारी करताना भरकटलेल्या दोन बोटींना पाकिस्ताननं (Pakistan) ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या बोटीवरील एकूण 16 जण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. यामधील 7 जण पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. पालघरमधील मच्छिमार संघटनेनं (Fishermen's Association in Palghar) यासंदर्भात माहिती दिली आहे. या सर्वांना पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीनं (Pakistan Maritime Security Agency) ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही पालघरमधील मच्छिमार संघटनेनं दिली आहे.
पालघर (Palghar News) जिल्ह्यातील खलाशी मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी गुजरातमधील (Gujrat) ओखा (Okha Port) आणि पोरबंदर (Porbandar Port) या भागात जात असतात. जवळपास दहा ते बारा हजार मच्छीमार कामगार पालघर जिल्ह्यातून (Palghar District) या भागांत रोजगारासाठी जातात. याच भागातील दोन बोटी भरकटल्यानं पाकिस्तान हद्दीत गेल्या आहे. त्यामुळे या बोटींवरील एकूण सोळा मच्छीमार खलाशी मजूर यांना पाकिस्तान सैनिकांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. यामधील सात खलाशी मच्छीमार कामगार पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे.
4. आजपासून मुंबईकरांचा प्रवास महागला, मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीची नवीन भाडेवाढ लागू होणार, बारकोड स्कॅन करुन प्रवाशांना दरपत्रकाची वैधता तपासता येणार
आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. राज्य सरकार आणि रिक्षा टॅक्सी युनियनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारनं दिलेल्या मंजुरीनुसार, रिक्षासाठी आता 23 रुपये तर टॅक्सीसाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी युनियननं संप मागे घेतल्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी अडचण थांबली असली तरी मुंबईकरांचा प्रवास मात्र महागला आहे.
आजपासून मुंबईत टॅक्सीचे भाडं 3 रुपयांनी तर ऑटोरिक्षाचं भाडं 2 रुपयांनी वाढणार आहे. म्हणजेच, मुंबई आणि महानगर भागातील लोकांना आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीनं प्रवास करण्यासाठी किमान 28 रुपये आणि ऑटोरिक्षाने प्रवास करण्यासाठी 23 रुपये मोजावे लागणार आहेत. आजपासून नवीन भाडे लागू होणार आहे. दरम्यान, ऑटो आणि टॅक्सीचं भाडं वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती, मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नव्हतं.
5. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस शिर्डी, नाशिक दौऱ्यावर, शिर्डीत साई दर्शनानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, नाशिकमध्येही पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 01 ऑक्टोबर 2022 : शनिवार
6. चंपासिंह थापानंतर मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येतायत, धुळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य, दसरा मेळाव्याआधीच राजकीय चर्चांना उधाण
7. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर येणाऱ्या शिवसैनिकांना रोखलं जाण्याची ठाकरे गटाला शंका, मेळाव्याआधी दोन्ही गटांमध्ये टीझर वॉर
8. मुंबईतील कांदिवलीमध्ये दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांचा चौघांवर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी
9. चंद्रपूरच्या ताडोबात पूर्णपणे निर्बंध मुक्त पर्यटन, आजपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला, पर्यटक आणि स्थानिकांना खूशखबर
10. ऐन सणासुदीत रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना झटका, रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळं गृहकर्जासह सर्व कर्ज महागणार, पतधोरण जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात उसळी