Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 31 ऑगस्ट 2022 : बुधवार : एबीपी माझा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करताना भक्तांचा उत्साह शिगेला, चांद्यापासून बांद्यापर्यंत गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग
Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट... आज श्री गणेश चतुर्थी... (Ganesh Chaturthi) ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे. आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे. सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करुन दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला (Ganesh Utsav 2022) प्रारंभ होईल. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे. पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे.
गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त
बाप्पाचं आगमन हा अत्यंत आनंदाचा दिवस असतो. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. पंचांगाप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आहे, असं प्रसिद्ध दाते पंचांगचे प्रमुख मोहन दाते यांनी दिली आहे. "ही स्थापना करताना आपण साधारणतः ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी करु शकता. त्यासाठी वेगळे विशेष कोणतेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. घरातली सकाळची पूजा झाली की, त्यानंतर गणरायची उत्साहात स्थापना करावी. ज्यांच्याकडे जितक्या दिवसचा गणपती आहे त्यांनी त्याप्रमाणे सकाळी पूजा आणि संध्याकाळी आरती करावी," असं मोहन दाते यांनी सांगितलं.
2. दररोज सकाळी एबीपी माझावर सिद्धिविनायकाची तर संध्याकाळी पुण्यातील प्रसिद्ध गणपतीची आरती, राज्यभरातल्या प्रमुख मंडळांच्या गणरायाचं दर्शन एबीपी माझावर
3. शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री गणेशोत्सव मंडळांना भेट देणार, गणेशोत्सवाच्या निमित्तानं महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा श्रीगणेशा
4. उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यातील आर्थिक दुर्बल घटकांना मिळणाऱ्या 10 टक्के आरक्षणाची घटनात्मक परीक्षा, 13 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात
5. भाजप अण्णांच्या खांद्यावरुन बंदुक चालवतंय, मद्य धोरणावरुन अण्णा हजारेंच्या खरमरीत पत्राला दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांचं प्रत्युत्तर
6. आता घरबसल्या करा ऊसाची नोंदणी, साखर आयुक्तालयाकडून 'महा-ऊस नोंदणी' अॅपची निर्मिती
7. झारखंडच्या दुमकामध्ये एकतर्फी प्रेमातून मुलीला संपवलं, देशभरात संतापाची लाट, आरोपीला फाशी देण्याची मागणी
8. देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये 19 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, NCRB अहवालातील माहिती
9.चीनमधील बँकांमध्ये 46 हजार कोटींचा महाघोटाळा,चौकशीनंतर 234 जणांना अटक,गुंतवणूकदारांना व्याज देण्याचं आश्वासन देत फसवणूक
10. युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात टीम इंडियाचा दुसरा साखळी सामना आज हाँगकाँगशी, भारतीय संघाचा कसून सराव