एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यभरातल्या 3 हजार 700 ग्रामपंचायतींचा आज निकाल
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी होणार आहे.
मुंबई : राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी होणार आहे. कालच (सोमवार) या निवडणुकीचं मतदान पार पडलं. जवळपास 81 टक्के मतदानाची नोंद कालच्या मतदानात झाली.
काल 18 जिल्ह्यातील जवळपास 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झालं. यातील साधारण 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
तर काही ठिकाणी विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आज 3 हजार 700 ग्रामपंचायतींचा निकाल लागणार आहे. त्यामुळे आता दिवाळीआधी कोण दिवाळी साजरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
- ठाणे- 33
- पालघर- 50
- रायगड- 162
- रत्नागिरी- 154
- सिंधुदुर्ग- 293
- पुणे- 168
- सोलापूर- 181
- सातारा- 256
- सांगाली- 425
- कोल्हापूर- 435
- उस्मानाबाद- 158
- अमरावती- 250
- नागपूर- 237
- वर्धा- 86
- चंद्रपूर- 52
- भंडारा- 361
- गोंदिया- 341
- गडचिरोली- 24
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
क्रीडा
क्रिकेट
धाराशिव
Advertisement