Todays Headline 17th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline 17th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू
आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन
हैदराबादला 1948 मध्ये भारत सरकारने निझामाच्या राजवटीविरुद्ध पोलीस कारवाई करून भारतात सामावून घेतले. वल्लभभाई पटेल यांनी पोलिस कारवाई करण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे हैदराबाद मुक्त केलं. त्याचं स्मरण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन पाळला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. या दिवशी संपूर्ण देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदींचा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यप्रदेश दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 10:45 वाजता, पंतप्रधान कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले चित्ते सोडतील. त्यानंतर, दुपारी 12 च्या सुमारा ते कराहल, श्योपूर येथे महिला बचतगट सदस्य/सामुदायिक संसाधन व्यक्तींसोबत बचतगट संमेलनात सहभागी होणार आहेत
सात दशकानंतर भारताच्या जंगलांमध्ये पुन्हा दिसणार चित्ता
जवळपास 70 वर्षांनंतर भारतातील जंगलात चित्ता परत येणार आहे. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान (Kuno Palpur आफ्रिकी चित्त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. उद्या सकाळी 8.30 वाजता हे चित्ते भारतात येणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या 1200 हून अधिक स्मृतीचिन्हांचा आणि भेटवस्तूंचा ई-लिलाव
संस्कृती मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या 1200 हून अधिक प्रतिष्ठित आणि संस्मरणीय स्मृतीचिन्हांच्या आणि भेटवस्तूंच्या ई-लिलावाचे चौथे पर्व 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 दरम्यान, आयोजित केले आहे. केंद्रीय संस्कृती , पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास विभाग मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या आगामी लिलावाबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने 5 जुलैपासून 75 दिवसांची स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद् ही मोहिम सुरु करण्यात आली. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या 7500 किलो मीटर लांबीच्या किनार पट्टीवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत देशभारातील 75 समुद्र किना-यांवर 75 दिवसांची मोहिम राबविण्यात आली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल
क्षयरोगमुक्त भारत अभियानाची सुरुवात
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे क्षयरोगमुक्त भारत अभियानाची सुरुवात होणार आहे. यावेळी ज्या व्यक्तींनी किंवा संस्थांनी क्षयरुग्ण दत्तक घेऊन त्यांची काळजी घेण्याची तयारी दर्शविली आहे अश्या निक्षय मित्रांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते क्षयरोग रुग्णांना पौष्टिक धान्य किट दिले जाणार आहेत
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्हा दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्या शनिवारी सकाळी 7 वाजता नांदेड येथे विमानाने आगमन होऊन ते खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी अल्पोपहार घेण्यासाठी जातील. त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे शासकीय ध्वजारोहण,पुष्पचक्र अर्पण करून लगेच हैद्राबादकडे रवाना होतील. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे शासकीय ध्वजारोहन संपन्न होणार आहे.नांदेड जिल्ह्यास पालकमंत्री नसल्या कारणाने आता नांदेड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी थेट उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न होणार आहे.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार हे उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
अजित पवार हे उद्या बीडच्या माजलगाव शहरामध्ये येणार आहेत सकाळी साडेआठ वाजता अजित दादाच्या हस्ते मराठवाडा मुक्ति संग्रामचे ध्वजारोहण होईल. त्यानंतर कैलासवासी सुंदरराव सोळंके यांच्या जयंतीनिमित्त चे कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमानंतर अकरा वाजता माजलगाव शहरांमध्ये कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
जळगावमध्ये कापूस परिषद
खानदेश कापूस असोसिएशनच्यावतीने आज आणि उद्या जळगाव मध्ये कापूस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये स्थानिक काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह देश विदेशातील सहाशे कापूस आयातदार आणि निर्यातदार सहभागी होणार आहे