LIVE UPDATES | खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे सोलापूर जिल्हा न्यायालयाचे आदेश
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. भारतात 6 जणांना कोरोना व्हायरसची लागण, उपाययोजनांसाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक, कोरोनामुळे लष्कराचा युद्धाभ्यास रद्द होण्याची शक्यता
2. मराठीजनांच्या दणक्यानंतर तारक मेहताच्या टीमकडून माफीनामा, मुंबईची भाषा हिंदी असल्याच्या संवादावरुन मालिकेवर चौफेर टीका
3. मुस्लीम आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका ठरलीच नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे सरकारमधले मतभेद चव्हाट्यावर, मलिकांनी केली होती अध्यादेश काढण्याची घोषणा
4. मुंबईत लवकरच होर्डिंग पॉलिसी, होर्डिंग्समुळे झालेल्या वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंची माहिती, औरंगाबादेत अवैध होर्डिंग्स काढण्याचे न्यायालयाचे आदेश
5. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना लवकरच गणवेश, अन्न आणि मानके सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर, महिन्यातून प्रत्येक डेअरीची किमान एकदा तपासणी
6. सोशल मीडिया सोडण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्वीटचा सस्पेन्स संपला, रविवारी महिला सांभाळणार पंतप्रधानांचे सोशल मीडिया अकाऊंटस, महिला दिनानिमित्त घोषणा