(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आजही ठाकरे सरकारचं खातेवाटप नाही? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यालयातून बाहेर पडले
LIVE
Background
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. ठाकरे सरकारचं खातेवाटपाचा गुंता सुटला, आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, परिवहन आणि कृषी खातं शिवसेनेकडेच राहणार
2. जळगाव जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपचा झेंडा, खडसे-महाजनांचा जल्लोष, औरंगाबादेत कायदेशीर पेच, तर बीड जिल्हा परिषदेसाठी धनंजय मुंडेंकडून मोर्चेबांधणी सुरु
3. काँग्रेसच्या सेवादलाच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, सावरकरांचे नातू आक्रमक, फडणवीस आणि पाटलांचा काँग्रेस, शिवसेनेवर हल्लाबोल
4. आमदारांच्या पगार आणि पेन्शनसाठी 5 वर्षात 500 कोटी रुपये खर्ची, एसटीच्या कर्मचाऱ्यांवर मात्र उपासमारीची वेळ, कोट्यधीश आमदारांना पेन्शन कशाला, सामान्यांना सवाल
5. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचा सेनेला धक्का, काँग्रेस-मनसेच्या मदतीनं स्थायी समितीचं सभापतीपद काबीज, शिवसेनेच्या एका नगरसेवकाची ऐनवेळी दांडी
6. प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती बिगुल वाजलं, आमदार महेश लांडगेंच्या हस्ते स्पर्धेचं उद्धघाटन, पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात पैलवानांचा शड्डू