टीम इंडियाचा मालिका विजय, वेस्ट इंडिजवर चार विकेट्सने मात, विराट, रोहित, राहुलची अर्धशतकं
LIVE
Background
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
देशातील आणि राज्यातील बातम्यांना संक्षिप्त आढावा
1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा, सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखाचं कर्ज माफ, सरसकट कर्जमाफीची शेतकरी नेते, विरोधकांची मागणी
2. महाराष्ट्रात विभागनिहाय मुख्यमंत्री कार्यालय, 50 ठिकाणी 10 रुपयांत शिवभोजन तर पूर्व विदर्भात पोलाद प्रकल्प, मुख्यमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा
3. गृहखातं शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची दाट शक्यता,सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्यानंतर अजितदादांच्या मंत्रिपदाच्या चर्चेला उधाण
4. फडणवीस सरकारच्या काळातील 65 हजार कोटींची काम संशयाच्या भोवऱ्यात, कॅगच्या अहवालानंतर शरद पवारांकडून चौकशीची मागणी
5. एल्गार परिषदेचा सूड भावनेतून तपास, भाजप आणि पुणे पोलिसांवर पवारांचे ताशेरे, दुफळी निर्माण करण्याच्या उद्देशानं नागरिकत्त्व कायदा आणल्याचा आरोप
6. भारत विरुद्ध विंडीज एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना आज कटकमध्ये, मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघात रंगणात अटीतटीची लढाई