नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन दिल्लीत आंदोलन पेटलं, विद्यार्थ्यांनी तीन बससह मोटारसायकल पेटवल्या, पोलिस बंदोबस्त तैनात
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. राष्ट्रीय महामार्गावर आजपासून फास्टटॅग अत्यावश्यक, विनाफास्टटॅग संबंधित मार्गिकेत शिरल्यास दुप्पट टोल आकारणी
2. उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार, दूध उत्पादक आणि व्यावसायिकांच्या बैठकीत निर्णय, ग्राहकांना भुर्दंड बसणार
3. राहुल गांधींच्या सावरकरांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेना-काँग्रेस आमनेसामने, सावरकरांवर तडजोड होणार नाही, संजय राऊतांचं ट्वीट, उद्धव ठाकरेही नाराज
4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जोडे मारावेत, रणजित सावरकरांची आक्रमक प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीसांकडूनही राहुल गांधींवर हल्लाबोल
5. 80 तासांचं सरकार पाहून हसावं की रडावं कळेना, एबीपी माझाच्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य, पुन्हा शुन्यातून सुरुवात करण्यासाठी कोअर कमिटीतून बाहेर
6. चेन्नईत आज भारत-वेस्ट इंडिज पहिला एकदिवसीय सामना, टी20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज