एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE UPDATE | भीमा कोरेगाव प्रकरण : लेखक गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
- सत्तास्थापनेसाठी भाजप, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला राज्यपालांकडून निमंत्रण
2. सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी मुदतवाढीला राज्यपालांचा नकार, वेळ नाकारली दावा कायम : आदित्य ठाकरे
3. Maharashtra Politics | राज्यपालांनी वाढीव वेळ देण्यास नकार दिला हे चुकीचं, काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांची नाराजी
4. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी, लिलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
5. काँग्रेसच्या निर्णयानंतर आम्ही निर्णय घेणार : नवाब मलिक
6. जेएनयूमध्ये फी दरवाढीविरोधात आंदोलन, पोलीसांनी विद्यार्थ्यांनी घेतले ताब्यात
16:55 PM (IST) • 12 Nov 2019
12:34 PM (IST) • 12 Nov 2019
हिंगोली : झाडाला गळफास घेऊन दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, औंढा नागनाथ तालुक्यातील वाळकीचे शेतकरी संभाजी लक्ष्मण मुकाडे वय 59, तर सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील शेतकरी संजय पिराजी चव्हाण 40 वर्ष यांची आत्महत्या
13:11 PM (IST) • 12 Nov 2019
कोकणातील हापूस आंबा नाही तर चक्क आफ्रिकन हापूस आंब्याची चव आता भारतीयांना चाखता येणार आहे.आफ्रिकेमधील मलावी देशात हापूस आंब्याचे उत्पादन काढण्यात आले आहे. कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच या हापूस आंब्याची चव, रंग , सुगंध असल्याने खवय्यांना सुवर्णसंधी आहे. मलावी मधील 600 हेक्टर जमिनीवर या हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. 8 वर्षांपूर्वी रत्नागिरी मधून 40 हजार हापूस आंब्याच्या काड्या मलावी मध्ये नेल्या होत्या. मलावी मधील हवामान कोकणातील हवामानासारखेच उष्ण दमट असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला फळधारणा चांगली झाली आहे . त्यामुळे पुढील एक वर्ष अफ्रिकन हापूस एपीएमसीमध्ये दाखल होणार आहे. रोज 600 ते 700 पेट्या हापूस आंब्याची आवक होणार आहे. सध्या हा हापूस होलसेल मध्ये 1400 ते 2000 पर्यंत विकला जात आहे
08:44 AM (IST) • 12 Nov 2019
08:26 AM (IST) • 12 Nov 2019
अलिबागच्या समुद्रकिनारी आणखी बेकायदा बांधकामे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले. त्याचवेळी, स्थानिक न्यायालयाची स्थगिती नसलेल्या पाच बांधकामांवर तातडीने कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला सार्वजनिक बांधकाम विभागाने सहाय्य पुरवावे, असे निर्देशही दिले.अलिबाग तालुक्यातील वरसोली, सासवणे, कोलगाव, डोकवडे या गावांतील समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या बेकायदा बंगल्यांच्या प्रश्नावर 'अखिल भारतीय मराठा सेवा संघ शंभूराजे युवाक्रांती' या संस्थेने अॅड. उदय निघोट यांच्यामार्फत केलेल्या जनहित याचिकेच्या पुढील सुनावणीत न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
करमणूक
क्राईम
Advertisement