एक्स्प्लोर
Advertisement
कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याला वेग
कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरु राहणार आहेत.
मुंबई : शेतकरी कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरु राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी 19 हजार 537 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.
त्यानुसार, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी शनिवार आणि रविवार राज्यातील सर्व जिल्हा बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आज याच कामासाठी राज्यातील सर्व बँकांच्या शाखा सुरु राहणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
लातूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement