एक्स्प्लोर
पुण्यात आज पाणीपुरवठा बंद
पुणे महानगरपालिकेने शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. उद्यादेखील पुणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
पुणे : महानगरपालिकेने शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी महापालिकेकडून दुरुस्तीचे कारण सांगण्यात आले होते. आज (गुरुवारी) पुन्हा दुरुस्तीचे कारण सांगून पालिकेने पुण्यातील पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. उद्यादेखील पुणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे आज विद्युत आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement