01 December Headline : गुजरात विधानसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान; पंतप्रधानांचा रोड शो, औरंगाबादेत रिक्षाचालकांचा संप; आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी...
Todays Headline 01 December : गुजरात विधानसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. तर अहमदाबादमध्ये पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे. इकडे औरंगाबादेत रिक्षाचालकांचा संप, शिवसेनेचं आंदोलन होणार आहे.
Todays 01 December Top Headline : बातमी कधी आणि कशी येईल सांगता येत नाही. अशात काही कार्यक्रम मात्र ठरलेले असतात. आज दिवसभरात काय काय कार्यक्रम आहेत. याबाबत आम्ही आपल्याला या बातमीतून माहिती देत आहोत. तर आज म्हणजेच 1 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. तर अहमदाबादमध्ये पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे. इकडे औरंगाबादेत रिक्षाचालकांचा संप, शिवसेनेचं आंदोलन होणार आहे. तिकडे नांदेडमध्ये आम्हाला तेलंगणात सामिल करा, असं म्हणत काही गावकरी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. वाचा आज दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडींबद्दल...
Gujrat Election: गुजरातमध्ये आज विधानसभेचं पहिल्या टप्प्यासाठी मतदान
गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत असून आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. आज पहिल्या टप्प्यात एकूण 2,39,76,760 मतदार मतदान करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 70 महिला उमेदवारांसह 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेस सर्व 89 जागांवर लढत आहेत. आम आदमी पक्षाने 88 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्षानेही 57 उमेदवारांना तिकीट दिले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमने पहिल्या टप्प्यात केवळ 6 उमेदवार उभे केले आहेत.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचा रोड शो
पहिल्या टप्प्याचं मतदान दोत असताना पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये मेगा रोड शो आज होणार आहे. अहमदाबादमधील पाच विधानसभा मतदारसंघातून हा रोड शो जाणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 पर्यंत हा रोड शो असेल. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सानंदमध्ये सकाळी 10.30 वाजता रोड शो करतील.
मुंबईत गुंतवणूकदारांची बैठक
मुंबई - कोळसा खाणींच्या व्यावसायिक लिलावात बोली लावणाऱ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आज मुंबईत गुंतवणूकदारांची बैठक होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी असतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असतील.
राज्यपालांवर महाभियोग चालणार?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची मागणी करत हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.
विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांचा संप
आपल्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद शहरातील रिक्षाचालक आज संप करणार आहेत. शहरात साधारण 15 रिक्षा संघटना आहेत. संपामुळे लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे.
आम्हाला तेलंगणात सामिल करा, नांदेडमधील काही गावाचं आंदोलन
नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्रात सीमा भागात रहाणाऱ्यां नागरिकांचे तेलंगणात सामिल करा आंदोलन आज होणार आहे. नागरिकांचे प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे या कृती समितीकडून आंदोलन होत आहे. माहूर, किनवट, धर्माबाद, उमरी, देगलूर, बिलोली तालुक्यातील काही गावांची तेलंगणात जाण्याची इच्छा आहे. दुपारी 12 वाजता तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला जणार आहे.
श्रद्धाच्या आरोपीची आज नार्को टेस्ट
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची आज नार्को टेस्ट होणार आहे. एफएसएल बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात नार्को टेस्ट होणार आहे. साधारण 45 मिनिट ही टेस्ट चालते.
औरंगाबाद शिवसेना आंदोलन
सरकारच्या विरोधात आज शिवसेना जिल्ह्यातील आठ ठिकाणी आंदोलन करणार आहे. यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गंगापूरच्या इसरवाडी फाटा येथे, तर चंद्रकांत खैरे वैजापूर येथील शिऊर बंगला येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत.
नशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेट सक्ती लागू केली जाणार
नाशिक – नशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेट सक्ती लागू केली जाणार आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली झाल्यानंतर नशिकमध्ये हेल्मेटसक्ती ठेपळली होती. आता नव्याने हेल्मेट सक्तीचे आदेश काढण्यात आलेत.
पुणे ते सिंगापूर या नव्या विमानसेवेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. एअर विस्तारा एअरवेजची ही सेवा असेल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर
सिंधुदुर्ग – मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता वेंगुर्ला येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यांनतर दुपारी 4 वाजता मालवण येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.