एक्स्प्लोर

पालघर साधू हत्याकांडप्रकरणी तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यासह तीन पोलिस बडतर्फ

पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधुंच्या हत्याकांडप्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यासह दोन पोलिसांनाही बडतर्फ करण्यात आले आहे.

पालघर : पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधुंच्या हत्याकांडप्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे यांना पोलीस विभागातून बडतर्फ करण्यात आले आहे. काळेंसह आणखी दोन पोलिसांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. यात उपनिरीक्षक रवी साळुंखे, कॉन्स्टेबल नरेश धोडी यांचा समावेश आहे.

16 एप्रिल 2020 रोजी झालेल्या या हत्याकांडात मुंबईहून सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी प्रथम कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर. बी. साळुंखे व दोन कॉन्स्टेबल यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले आहे. तर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. हे प्रकरण घडल्यानंतर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या 35 पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती.

गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल केले आहे व याची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होत आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येत असून कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक आनंदराव काळे यांच्यासह उपनिरीक्षक रवी साळुंखे, कॉन्स्टेबल नरेश धोडी यांना बडतर्फ (डिसमिस) करण्यात आले आहे.

Palghar mob lynching | गडचिंचले तिहेरी हत्याकांड प्रकरण; 28 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल न झाल्याने जामीन मंजूर

डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील 28 आरोपींना 12 ऑगस्ट रोजी स्थानिक न्यायालयाने डीफॉल्ट जामीन मंजूर केला आहे. डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून जमावकडून दोन साधू आणि त्यांचा चालक अशा तिघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दाखल दोन आरोपपत्रात 28 जणांवर निर्दिष्टित दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. अशा 28 जणांना डहाणू प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.व्ही. जावळे यांनी जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिल्याचे वकील अमृत अधिकारी यांनी सांगितले.

16 एप्रिल रोजी पालघरमधील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू आणि वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या तिहेरी हत्या प्रकरणात 165 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील 11 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. त्यापैकी 2 जणांविरोधात आरोपपत्र दाखल झालं आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागातमार्फत करण्यात आला. संबंधित प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. सीआयडीने याप्रकरणी आतापर्यंत 808 संशयितांची चौकशी केली असून 108 जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. पहिल्या गुन्ह्यात 126 आरोपींच्या विरोधात 4 हजार 955 पानांचे आणि दुसऱ्या गुन्ह्यात 126 आरोपींविरोधात 5 हजार 921 पानांचे अशी दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत. महत्त्वाच्या बातम्या : Palghar mob lynching | गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणानंतर कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या पालघर हत्याकांड | चार ड्रोनच्या माध्यमातून जंगलात फरार झालेल्या आरोपींचा शोध #पालघर : झुंडीच्या विकृतीचे बळी
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget