एक्स्प्लोर
Advertisement
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तिघांची हत्या
मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी एक बॅनर लावलं आहे. '22 एप्रिल 2018 ला कसनसूर-तमिळगुण्डा घटनेमध्ये आमचे 40 कॉम्रेड शहीद झाले होते. त्या घटनेला दोषी आणि पोलिसांना माहिती देणारे मालू दोगे मडावी, कन्न रैनू मडावी, लालसू मासा कुडयेठी यांना मृत्यूची शिक्षा दिली, असा या उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.
गडचिरोली : गडचिरोलीच्या भामरागडमधील कसनासूर गाववातील तिघांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर तिघांचे मृतदेह नक्षलवाद्यांनी कोसफुंडी फाट्याजवळ रोडवर फेकून दिले आहेत.
पोलिसांना मदत केल्याच्या संशयावरुन या तिघांची हत्या करण्यात आली आहे. मालू डोग्गे मडावी, कन्ना रैनू मडावी, लालसू कुडयेटी अशी या तिघांची नावं आहेत. हे तिघे पोलिसांचे खबरी आसल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता.
कसनासूर गावात 22 एप्रिल 2018 रोजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली होती. या चकमकीत 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांन यश आलं होतं. या घटननेचा बदला घेण्यासाठी या तिघांची हत्या केल्याचं नक्षलवाद्यांनी लावलेल्या बॅनरमध्ये नमूद केलं आहे.
मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी एक बॅनर लावला आहे. '22 एप्रिल 2018 ला कसनसूर-तमिळगुण्डा घटनेमध्ये आमचे 40 कॉम्रेड शहीद झाले होते. त्या घटनेतील दोषी आणि पोलिसांना माहिती देणारे मालू डोग्गे मडावी, कन्ना रैनू मडावी, लालसू कुडयेटी यांना मृत्यूची शिक्षा दिली, असा या उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.
तिघांच्या हत्तेनंतर गावातील काही लोकांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याचंही बोललं जात आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement