Accident : बारामतीत भीषण अपघात, मायलेकासह तिघांचा मृत्यू
Baramati News update : बारामती तालुक्यातील फोंडावाडा येथे चारचाकीने तीन जणांना धडक दिली. त्यात तिघांचाही मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मायलेकरांचा समावेश आहे.
Baramati News update : बारामती- जेजुरी रस्त्यावर ( Baramati Jejuri Road) भीषण अपघात (Accident ) झाला आहे. या अपघातात मायलेकासह तिघांचा मृत्यू झालाय. नंदा गंगाराम राऊत, अतुल गंगाराम राऊत आणि दशरथ पिसाळ (रा. फोंडावाडा ) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील दोघांचा जागीच तर एकाचा रूग्णालयात मृत्यू झालाय. आज संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील फोंडावाडा येथे चारचाकीने तीन जणांना धडक दिली. त्यात तिघांचाही मृत्यू झाला. चारचाकी गाडीने दुचाकी वरील दोन व्यक्ती आणि एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. यात नंदा गंगाराम राऊत आणि त्यांचा मुलगा अतुल गंगाराम राऊत तसेच फोंडावाडा येथील दशरथ पिसाळ यांचा मृत्यू झाला आहे.
बारामती तालुक्यातील कऱ्हावाघज येथील राऊत कुटुंबातील आई व मुलगा दुचाकीवरुन मोरगाव- बारामती रस्त्याने कऱ्हावाघजला चालले होते. तर फोंडवाडा येथील दशरथ पिसाळ हे रास्त्यावरून चालले असतान बारामतीच्या बाजूने वेगाने चारचाकी गाडी आली. या गाडीने तीघांना जोरदार धडक दिली. यामध्ये दोघे जण जागीच ठार झाले तर नंदा राऊत यांना बारामती येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चालक फरार
दरम्यान, या भीषण अपघातानंतर दुचाकीला धडक दिलेले चार चाकी वाहन घटनास्थळीच होते. मात्र, त्याचा चालक तेथून पळून गेला असून पोलिस आता आता चालकाचा शोध घेत आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिस करत आहेत. चालकाचा शोध लागल्यानंतरच अपघाताबाबत अधित माहिती मिळू शकेल असे पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध सूरू असून लकरच त्याचा देखील तपास लागेल असे पोलिसांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या