एक्स्प्लोर

तिसरी आघाडी 150 जागा लढणार, शिंदे-फडणवीसांविरुद्ध बच्चू कडू भिडणार; शरद पवारांवरही हल्लाबोल

परिवर्तन महाशक्ती (Parivartan Mahashakti) विधानसभेच्या 150 जागा लढवणार आहे. याबाबतची माहिती छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी दिली आहे.

Parivartan Mahashakti News : पुण्यात (Pune) आज परिवर्तन महाशक्तीची (Parivartan Mahashakti) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी (Raju Shetti) उपस्थित होते. या बैठकीत 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असो की देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात देखील उमेदवार देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमचं बोलणं सुरु 

दरम्यान, मनोज तरंगे पाटील यांच्याशी देखील आमचं बोलणं सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु असल्याची माहिती  परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.

 परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला

सामान्य माणसाला आपलं वाटेल असं सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करु असे बच्चू कडू म्हणाले. आम्ही चांगले उमेदवार देणार असल्याचे कडू म्हणाले. पवारसाहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात? असा सवालही कडू यांनी केला. तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवालही कडू यांनी उपस्थित केला. परिवर्तनाचा अधिकारी युतीलाही नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला असल्याचे कडू म्हणाले. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थानं कामाचं असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असल्याचे कडू म्हणाले. 

स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणार : राजू शेट्टी

स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आमनच्याकडे छोट्या मोठ्या 30 ते 40 संघटना असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. प्रस्थिपीत लोकांच्या विरोधात लढा देणारे उमेदवार देणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. पण त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. त्यांनी आमच्यासोबत यावं अशी आमची भूमिका असल्याचे संभाजीराजे म्हणाले. राज्यात आचारसंहिता लागू होऊन तीन दिवस झाले आहेत. त्यामुळं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

येत्या विधानसभेत तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी; बच्चू कडूंची मोठी घोषणा, मनोज जरांगेंनाही खुलं आमंत्रण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : मविआच्या जागावाटपाआधीच ठाकरेंचे पत्ते ओपनAaditya Thackeray On Ashish Shelar :आशिष शेलारांना मेंटल कौन्सिलिंगची गरज,ठाकरे काय बोलले?Zero Hour : मुख्यमंत्रिपदावर शरद पवारांचं सूचक विधान, पवारांकडून अप्रत्यक्ष घोषणा?Zero Hour Guest Center : मविआचा 260 जागांचा तिढा सुटला, 20 ते 25 जागांचा तिढा कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, 15 मतदारसंघातील उमेदवार ठरले; एबी फॉर्मही दिले?
शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, 15 मतदारसंघातील उमेदवार ठरले; एबी फॉर्मही दिले?
Vasundhara Oswal : ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
Multiple Bomb Threats to Indian Flights : भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
Embed widget