नागपुरात चोरट्यांनी वापरलं जुगाड तंत्र, CCTV कॅमेऱ्यांना केलं फेल, लाखोंचा मुद्देमाल चोरला
नागपुरात चोरट्यांनी नाईट विजन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना मोबाईलच्या टॉर्च द्वारे डीएक्टिव्हेट करत चोरी केल्याची घटना घडली आहे.
Nagpur : नागपुरात चोरट्यांनी नाईट विजन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना मोबाईलच्या टॉर्च द्वारे डीएक्टिव्हेट करत चोरी केल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर नगर पोलिस स्टेशन अंतर्गत जवाहर नगर भागात ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी सुमारे 14 लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान ऐवज चोरून नेला आहे
चोरट्यांनी त्यांच्याकडील मोबाईल चा वापर करत नाईट विजन कलर कॅमेरा ला डीऍक्टिव्हेट केले
जव्हारनगर मध्ये राहणारे तुषार पिदडी यांच्या घरी 28 नोव्हेंबरच्या पहाटे दोन चोरटे शिरले होते. तुषार पिदडी यांनी त्यांच्या घरी मोशन डिटेक्शन करणारे स्वयंचलित लाईटशी जोडलेले अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. मात्र चोरट्यांनी त्यांच्याकडील मोबाईल चा वापर करत नाईट विजन कलर कॅमेरा ला डीऍक्टिव्हेट केले आणि डी एक्टिवेशन मुळे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये रूपांतरित झालेल्या कॅमेरात त्यांचा चेहरा ओळखला जाणार नाही याची खात्री करत बिनधास्तपणे चोरी केली आणि 14 लाखांचा मुद्देमाल एका बॅगमध्ये घेऊन दुचाकीने पसार झाले.
धक्कादायक वास्तव समोर आले आहे
ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाल्यामुळे चोरटे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याना कशा पद्धतीने हतबल करून सहज चोऱ्या करत आहेत, हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याच परिसरात मेडिकल स्टोअर्स चालवणाऱ्या संजय कोल्हे यांच्या मेडिकल शॉप मध्येही सारख्या शरीरयष्टीच्या दोन चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून चोरी केली.विशेष म्हणजे कोल्हे यांच्या दुकानातून चोरट्याने सध्या थंडीचा काळ असल्यामुळे विविध बॉडी लोशन आणि निविया सारख्या महागडे कोल्ड क्रीम चोरून नेले.
दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे
दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात तर दिवसाढवळ्या घरे फोडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागपुरात देखील चोरीच्या घटनांचे त्याचबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात चोर चोरी करताना वेगवेगळ्या तंत्राचा वापर करत आहेत. नागपुरात चोरट्यांनी नाईट विजन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना मोबाईलच्या टॉर्च द्वारे डीएक्टिव्हेट करत चोरी केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी सुमारे 14 लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान ऐवज चोरुन नेला आहे. या घटनेमुळं नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























