एक्स्प्लोर

Jalgaon Crime Eknath Khadse: मोठी बातमी: जळगावात एकनाथ खडसेंच्या घरात चोरी, सोन्यासह रोकड लांबवली, काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरही पडला होता दरोडा

Jalgaon Crime Eknath Khadse: जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime Eknath Khadse: जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. यानंतर काहीच दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे. सहा ते सात तोळे सोने व 35 हजाराची रोकड लंपास करण्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  

याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने त्यांचा जळगावातील बंगला बंद होता. सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्याने नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तेथे गेल्यावर घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्याने तत्काळ खडसे यांना माहिती दिली. खडसे यांनी लगेचच पोलिसांना घटनेची खबर दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

Eknath Khadse: काय म्हणाले एकनाथ खडसे? 

एकनाथ खडसे म्हणाले की, रात्री घरफोडी झालेली आहे. बंगल्यातील सर्व रूमचे कुलुपं तोडून चोरी केलेली आहे. काही सामानाची चोरी झाली आहे. माझ्या रूममध्ये 35 हजार रुपये होते. पाच-पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या होत्या. त्या चोरीला गेलेल्या आहे. खाली आमचे नातेवाईक राहत होते. त्यांचे पाच तोळे सोने चोरीला गेलेले आहे. घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन चोरी केल्याचे दिसून येते. पोलिसांचा जळगाव जिल्ह्यात धाक उरलेला नाही. चोऱ्या, दरोडा, असे प्रकार सातत्याने होत आहेत. दोन नंबरचे धंदे वाढलेले आहेत. पोलिसांवर काही टीका केली तर तिथले स्थानिक मंत्री माझ्यावरच टिंगल करतात. काहीतरी वेगळाच अर्थ करतात. घटनेचे गांभीर्य पोलिसांना आणि सरकारला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Raksha Khadse: याआधी रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा

दरम्यान, 9 ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर व वरणगाव परिसरातील तीन पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते. यामध्ये मुक्ताईनगर येथील रक्षा फ्युअल (केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप), कर्की फाटा येथील ‘मनुभाई आशीर्वाद’ आणि तळवेल फाटा येथील ‘सय्यद पेट्रोल पंप’ या ठिकाणांचा समावेश होता. त्या रात्री बंदुकीचा धाक दाखवत आरोपींनी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर मिळून सुमारे 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष तपास पथक (Special Investigation Team) स्थापन केले होते. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी नाशिक व अकोला जिल्ह्यात छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल बावस्कर, देवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक केली होती. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Phaltan Doctor Case: मृत्यूनंतरही फिंगर लॉक वापरून मोबाइलमधील पुरावे डिलीट? मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी सांगितलं, व्हॉट्सॲपचा लास्ट सीन 11 वाजून 13 मिनिटाला दिसतंय, नेमकं काय घडलंय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Elections 2025: शेतकऱ्यांचा संताप उफाळला! स्थानिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; सत्ताधारी, विरोधकांच्या अडचणी वाढणार?
शेतकऱ्यांचा संताप उफाळला! स्थानिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; सत्ताधारी, विरोधकांच्या अडचणी वाढणार?
Hyundai Venue 2025 की Tata Nexon; किंमत पाहता कोणती SUV चांगली? काय आहेत दोन्हीची फिचर्स??
Hyundai Venue 2025 की Tata Nexon; किंमत पाहता कोणती SUV चांगली? काय आहेत दोन्हीची फिचर्स??
Akhilesh Yadav: यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते  मोहन भागवत
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते : मोहन भागवत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kashid Beach Tragedy: 'विद्यार्थ्यांना वाचवताना शिक्षकांनी जीव गमावला', अकोल्याच्या सहलीवर शोककळा
Nagpur Crime: तुरुंगातून सुटताच गुंड Ashfaq Khan चा पुन्हा धुमाकूळ, भर वस्तीत तोडफोड आणि मारहाण
Viral Video: मध्य प्रदेशमध्ये दोन वाघांमध्ये तुफान झुंज, थरारक व्हिडिओ व्हायरल
Tiger Translocation 'आमच्या पोटावर पाय का?',Chanda-Chandni वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा विरोध
Leopard Relocation: 'या बिबट्यांना Gujarat मध्ये कधी स्थलांतरित करणार?', जुन्नरमधील स्थानिकांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Elections 2025: शेतकऱ्यांचा संताप उफाळला! स्थानिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; सत्ताधारी, विरोधकांच्या अडचणी वाढणार?
शेतकऱ्यांचा संताप उफाळला! स्थानिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; सत्ताधारी, विरोधकांच्या अडचणी वाढणार?
Hyundai Venue 2025 की Tata Nexon; किंमत पाहता कोणती SUV चांगली? काय आहेत दोन्हीची फिचर्स??
Hyundai Venue 2025 की Tata Nexon; किंमत पाहता कोणती SUV चांगली? काय आहेत दोन्हीची फिचर्स??
Akhilesh Yadav: यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते  मोहन भागवत
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते : मोहन भागवत
Maharashtra Crime: मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
Matoshree Drone: ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोन भिरभिरत आला, सुरक्षारक्षक धास्तावले, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोन भिरभिरत आला, सुरक्षारक्षक धास्तावले, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
Tanaji Sawant: इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
Embed widget