सर्वसामान्य व्यक्ती समजून चोराने केली पोलिसांना बेदम मारहाण; बीडच्या येळंब घाटातील घटना
कारमधून पोलीस प्रवास करतायेत हे माहीत नसल्याने चक्क पोलिसांचीच गाडी अडवून त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या चोरांना चांगलीच अद्दल घडली आहे.
![सर्वसामान्य व्यक्ती समजून चोराने केली पोलिसांना बेदम मारहाण; बीडच्या येळंब घाटातील घटना Thieves beat police in beed for money सर्वसामान्य व्यक्ती समजून चोराने केली पोलिसांना बेदम मारहाण; बीडच्या येळंब घाटातील घटना](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/10043744/web-photo.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : कारमधून पोलीस प्रवास करतायेत हे माहीत नसल्याने चक्क पोलिसांचीच गाडी अडवून त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या चोरांना चांगलीच अद्दल घडली आहे. यापेक्षाही कहर म्हणजे या पोलीसाच्या गळ्याला चाकू लावून चक्क गुगल पे वरून एक लाख रुपये टाक अशी मागणी चोरांनी केली. वेळीच गावकरी धावले आणि त्यामुळे पोलिसांची चोरा कडून सुटका झाली आणि चार अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले.
हे चारही गुंड कुख्यात असून येळंबघाट जवळील पुलाखाली लूटमार करण्यासाठी शस्त्रांसह दबा धरुन बसले होते. याचवेळी पोलीस नाईक समाधान खराडे हे तेथून कारमधून जात होते. कारला दुचाकी आडवी लावून त्या चौघांनी मारहाण करत त्यांना लुटले. नागरिक व पोलिसांच्या मदतीने ते तावडीत सापडले. झडतीत त्यांच्याकडे दोन लोखंडी चाकू, कत्ती, बटनचा चाकू, दातऱ्या व धार असलेले दोन चाकू, एक जांबिया अशी शस्त्रे आढळली.
एखाद्या चित्रपटांमध्ये घडावा असा थरार बीड नेकनुर मार्गावरती काल दुपारी दीड वाजता घडला. सुग्रीव सक्राते मित्रासोबत कारमधून केजहून बीडकडे निघाले होते. सुग्रीव सक्राते हे केज ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत. सुग्रीव सक्राते यांची गाडी येळंब घाटच्या पुलाजवळ आली त्यावेळी पाठीमागून आलेल्या मोटरसायकल वरच्या दोघांनी कार समोर मोटरसायकल आडवी लावली. या दोन चोरांनी सर्वात आधी समाधान खराडे यांना कारमधून खाली खेचून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांचे मित्र सुग्रीव सक्राते यांनी सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांनाही मारहाण करायला सुरुवात केली हे नेमके काय घडत हे कळण्या आधीच येळंबघाट च्या रस्त्यावर फिल्मी स्टाईल हाणामारी चा थरारक घडत होता.
मोटरसायकल वरून आलेल्या मोहम्मद अब्दुल लतीफ याने कमरेला लावलेला धारदार चाकू काढून खराडे यांच्या गळ्याला लावला व हातातील घड्याळ आणि मोबाईल बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर पैशाची मागणी केली मात्र पैसे नाहीत असे म्हटल्यानंतर चक्क गुगल पे वरून एक लाख रुपये लवकर पाठव अशी मागणी चोरांनी यावेळी केली. दहा ते पंधरा मिनिट या दोन चोरासोबत हे दोघेजण मुकाबला करत होते.
भारत बंद असल्या कारणाने जवळच नेकनूर पोलीस वस्तीवर तैनात होते. या चौघांमध्ये हाणामारी चालू असतानाच रस्त्याने जाणारा एक जणांनी हटकले त्यावेळी त्या दोन चोरांनी त्याला दम देऊन सांगितले की तू निघून जा त्याने पुढे जाऊन गावकर्यांना सांगितले.गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि तेवढ्याच वेळामध्ये नेकनूर पोलीस सुद्धा आले त्यांनी दोन चोरांना ताब्यात घेतले..
दिवसाढवळ्या चक्क रोड वरती चोरी करणाऱ्या या दोघांकडे झाडा झडतीत दोन लोखंडी चाकू, कत्ती, बटनचा चाकू, दातऱ्या व धार असलेले दोन चाकू, एक जांबिया अशी शस्त्रे आढळली. मारहाणीत जखमी झालेले पोलीस कर्मचारी समाधान खराडे याना केजमध्ये खासगी दवाखान्यात उपचारा साठी दाखल केले आहे. पोलीस कर्मचार्याने दिलेल्या तक्रारीनुसार कलम 394, 341, 4/25आर्म ॲक्टनुसार नेकनूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)