एक्स्प्लोर
चोरट्यांचं डेअरिंग, महिला PSI ची लोडेड पिस्तूल चोरली

ठाणे: शहापूर परिसरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आता तर चोरट्यांनी थेट पोलिसांच्या घरांनाही लक्ष्य केलं.
चोरट्यांनी शहापूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या घरी हात साफ केला. इतकंच नाही तर चोरट्यांनी PSI दुसाने यांची सरकारी पिस्तूलसह दागिन्यांवर डल्ला मारला.
या प्रकारामुळे पोलीसच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, अर्चना दुसाने या गेल्यावर्षी शहापूरमध्ये रुजू झाल्या आहेत. पदभार स्वीकारताच त्यांनी परिसरातील अवैध दारु धंदे, मटका, जुगार अड्डे, गावठी दारु अड्डे यासारख्या अवैध धंद्यांना चाप बसवला.
मात्र चोरट्यांनी शहापूरजवळ कळंभे इथल्या गुजराती बाग परिसरात राहणाऱ्या PSI दुसाने यांच्याच घरी डल्ला मारला. घरात कोणी नसल्याचं पाहून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडून त्यामधील सुमारे 20 हजार किमतीचे सरकारी लोडेड पिस्टल आणि सुमारे 60 हजार किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 80 हजार किमतीचा ऐवज लंपास केला.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















