Solapur Crime Pooja Gaikwad: चार बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या अन् हातात पाचशेची नोट, सूचक वाक्य, पूजा गायकवाडचं ते इन्स्टाग्राम रिल व्हायरल
Solapur crime news: गेल्या दीड वर्षांपासून गोविंद बर्गे हे पूजा गायकवाड हिच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पूजा त्यांच्याशी बोलत नसल्याने त्यांची मानसिक अवस्था ठीक नव्हती.

Solapur Crime Pooja Gaikwad: बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) यांच्या मृत्यूप्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. मंगळवारी बार्शी तालुक्यातील सासुरे गावात गोविंद बर्गे (Govind Barge Murder) यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Suicide News) केली, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केल्याने याप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. गोविंद बर्गे यांचे पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) या 21 वर्षांच्या नर्तकीशी प्रेमसंबंध होते. पोलिसांनी तिला अटक केली असून तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पूजा गायकवाड ही इन्स्टाग्रामवर बऱ्याचदा रिल्स शेअर करत असे. गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर तिचे एक रिल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पूजा ही गेल्या काही दिवसांपासून गोविंद बर्गे यांच्याशी बोलत नव्हती. तिने साधारण आठवडाभरापूर्वी हे इन्स्टा रिल तयार केले होते. यामध्ये पूजा गायकवाड हिच्या हाताच्या चारही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहेत. तिच्या हातात पाचशेची एक कोरी करकरीत नोट आहे. या व्हिडीओत एक ऑडिओ असून पूजा गायकवाड त्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. 'मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे, हा माझ्या आयुष्यातून गेला तर माझं फार अवघड होईल', असा आशयाचा हा ऑडिओ आहे. या इन्स्टाग्राम रिलचा आणि गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याची चर्चा आता रंगली आहे.
पूजा गायकवाड ही आता तीन दिवस पोलीस कोठडीत असल्याने तिच्या चौकशीतून काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय, गोविंद बर्गे यांच्या पोस्टमार्टेम अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. गोविंद बर्गे हे त्यांच्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी आरपार जाऊन डाव्या भागातून बाहेर निघाली होती.
View this post on Instagram
Govind Barge Suicide: गोविंद बर्गेंनी पूजाला घेऊन दिला होता सात लाखांचा प्लॉट
गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांचे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गोविंद बर्गे यांनी पूजाला पावणेदोन लाखांचा मोबाईल आणि सोन्याचे दागिने घेऊन दिले होते. याशिवाय, गोविंद बर्गे यांनी 21 जानेवारी 2025 रोजी पूजाला बार्शी हद्दीतील मिरगणे प्लॉटिंगमध्ये एक प्लॉट घेऊन दिला होता. या प्लॉटची अंदाजित किंमत पावणेसात लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
View this post on Instagram
आणखी वाचा
बीडच्या माजी उपसरपंचाचा जीव नर्तिकेने घेतला? नातेवाईकांचा गाडीची बॅटरी, पिस्तुलाबाबत धक्कादायक दावा























