एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे : मुख्यमंत्री

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून एकूण 46 टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांकडून 7 टक्के पिक कर्ज वाटप झालं आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 6250 कोटी तर राष्ट्रीयकृत बँकांनी 2300 कोटी रुपये पिक कर्ज वाटप केलं आहे.

मुंबई : खरीप हंगामामध्ये बी बियाणे यांचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाणाच्या प्रकारात कडक शिक्षा होईल हे पाहा. तसेच कोणत्याही परिस्थितीत विशेषत: राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा. शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही, अशी तक्रार आली नाही पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. कृषि खरीप हंगाम कामांचा आढावा व बी बियाणे, खते, किटकनाशके, पिक कर्ज वाटप, कापूस, तूर व धान खरेदी बाबत आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी कृषि मंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते.

खरीप हंगामासाठी 43.50 लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती, त्यापैकी 40 लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे. याशिवाय 50 हजार मेट्रिक टन युरियाचं संरक्षित साठा करण्यात येत आहे.

पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना बांधावर बियाणे

खते व बी बियाणे बांधावर पुरवण्यासाठी 47 हजार 89 शेतकरी गट तयार करण्यात आले असून 1 लाख 55 हजार 755 मेट्रिक टन खत, 86 हजार 126 मेट्रिक टन बियाणे , 1 लाख 80 हजार 481 कापूस बियाणे पाकिटे बांधावर देण्यात आली आहेत. एकूण 5 लाख 27 हजार 483 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

पिक कर्ज वाटपाला गती द्यावी

कृषी मंत्री दादा भुसे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, पिक कर्ज वाटपाला अधिकाधिक गती देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या असून बँकांच्या संपर्कात अधिकारी आहेत. यावेळी प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी माहिती दिली की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून एकूण 46 टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांकडून 7 टक्के पिक कर्ज वाटप झालं आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 6250 कोटी तर राष्ट्रीयकृत बँकांनी 2300 कोटी रुपये पिक कर्ज वाटप केल्याचे त्या म्हणाल्या. बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचा 22 मे रोजीचा शासन निर्णय पोहोचवणे सुरू असून शेतकऱ्यांना पिक कर्जात अडथळा येऊ नये, अशा सूचना दिल्याचं त्या म्हणाल्या.

कापूस, तूर खरेदी एकंदर 381 लक्ष क्विंटल कापूस खरेदी झाला असून 9 लाख क्विंटल खरेदी राहिली आहे. 18.81 लाख क्विंटल तूर खरेदी झाली असून २2 लाख शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली आहे. 822 कोटी रुपयांचे चुकारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 18.90 लाख क्विंटल चणा खरेदी झाली असून 15 जुलैपर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे. याचेही चुकारे लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येतील.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu on Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीसाठी 'देवाभाऊ' अन् एकनाथ शिंदेंचे आभार; पण..; बच्चू कडू आंदोलनावर ठाम, नेमकं काय म्हणाले?
शेतकरी कर्जमाफीसाठी 'देवाभाऊ' अन् एकनाथ शिंदेंचे आभार; पण..; बच्चू कडू आंदोलनावर ठाम, नेमकं काय म्हणाले?
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
Shaktipeeth Highway: ...तर मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही; शेतकऱ्यांच्या थेट इशारा, शक्तीपीठ महामार्गाविरोधात माढ्यात विराट मोर्चा
...तर मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही; शेतकऱ्यांच्या थेट इशारा, शक्तीपीठ महामार्गाविरोधात माढ्यात विराट मोर्चा

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
Jalna Crime News: स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
Gold : आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
Dattatray Gade Swargate case: गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
Raosaheb Danve and Rajesh Tope: राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
Embed widget