एक्स्प्लोर
Advertisement
संपूर्ण पंढरपुराची भिस्त एकाच ATM वर, उभं राहण्यासाठी मंडपाची व्यवस्था
पंढरपूर : नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिना उलटून गेला तरी बँकांसमोरील गर्दी कायम आहे. ग्राहकांना उन्हात उभं रहावं लागू नये, यासाठी पंढरपूर येथील स्टेट बँकेच्या आवारात ATM साठी येणाऱ्यांना निवाऱ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेतील एकमेव ATM केंद्रात पैसे मिळत असल्याने याठिकाणी नेहमीच मोठी गर्दी असते. रांगेत पैसे घेणाऱ्यांना निवाऱ्यासाठी मोठा मंडप तर लावलाच आहे. शिवाय येथे आता स्पिकरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
सध्या सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने गर्दीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे बँक व्यवस्थापनाने ध्वनिक्षेपक बसवून ग्राहकांना सूचना देण्यास सुरुवात केली आहे . मात्र पंढरपुरात येणारे भाविक आणि संपूर्ण शहराची मदार एकाच बँकेवर असल्याने सर्वांचीच गैरसोय होत आहे.
अनेकांना बँकेसमोर सकाळपासून नंबर लावावा लागतो. अनेक नोकरदार काम सोडून एटीएमसमोर रांगेत उभे राहतात. मात्र ऐनवेळी पैसे संपल्यास दुसऱ्या एटीएमचा पर्याय देखील पंढरपुरात उपलब्ध नाही. त्यामुळे इथे अतिरिक्त एटीएम बसवण्याची मागणी होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement