एक्स्प्लोर

मनसेला महाआघाडीत घेण्यासंदर्भात अद्याप निर्णय नाही : अशोक चव्हाण

मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात मतभिन्नता आहे. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी आणि केंद्रातील नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

सोलापूर : आगामी निवडणुकीसाठी मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आलेला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात मतभिन्नता आहे. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी आणि केंद्रातील नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. संत सेवालाल जयंतीनिमित्त सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे बंजारा समाजाच्या वतीने आयोजित मेळाव्यासाठी अशोक चव्हाण उपस्थित होते.

अजित पवार आणि राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर अजित पवार सांगितले होते की, मी राज ठाकरेंना भेटलो. संवाद झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे म्हणून आमची भेट झाली. मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत काँग्रेसला कळवलं आहे. आम्हीही वरिष्ठांना कळवू, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. पुढे अजित पवार म्हणाले की, जागांबाबत चर्चेचा प्रश्नच नव्हता. आधी दोन्ही पक्षांनी मनसेला आघाडीत घेण्याबाबत स्वीकारलं पाहिजे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आघाडीसोबत आले तर फायदाच होईल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं होतं.

अशोक चव्हाणांची भाजप सरकारवर टीका

यावेळी अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली. दुष्काळाच्या फक्त घोषणा झाल्या, मात्र मदत काही मिळाली नाही. राज्यातील बेरोजगारी वाढतच चालली आहे. मात्र सरकारकडे कोणतीही उपाय योजना नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. बंजारा समाजच्या विविध मागण्या मेळाव्यात मांडण्यात आल्या.

याआधी सत्तेत असताना बंजारा समाजाच्या विविध मागण्या मान्य केल्या होत्या. जर पुन्हा सत्तेत आलो तर सर्व मागण्या पूर्ण करु, असं आश्वासन सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं.

संबंधित बातम्या

महाआघाडीत मनसे?, अजित पवार, राज ठाकरेंमध्ये गुप्त बैठक

राज ठाकरे आघाडीत आले तर फायदाच होईल : छगन भुजबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
Vijay Wadettiwar: काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
Satyajeet Tambe : मोठी बातमी: सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
मोठी बातमी : सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
Devendra Fadnavis: मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, घडामोडींना वेग
मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, घडामोडींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati : बारामतीत अजित पवारांच्या प्रचारासाठी रिक्षा सजल्याMahayuti : महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यताTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 21 ऑक्टोबर   2024: ABP MajhaVijay Wadettiwar  : मविआचा 17 जागांवर तिढा कायम - विजय वडेट्टीवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
Vijay Wadettiwar: काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
Satyajeet Tambe : मोठी बातमी: सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
मोठी बातमी : सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
Devendra Fadnavis: मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, घडामोडींना वेग
मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, घडामोडींना वेग
Maharashtra Assembly Elections 2024 : चांदवडमधील भाजप उमेदवारीचा चेंडू देवाभाऊंच्या कोर्टात, राहुल आहेर की केदा आहेर? फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष
चांदवडमधील भाजप उमेदवारीचा चेंडू देवाभाऊंच्या कोर्टात, राहुल आहेर की केदा आहेर? फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Embed widget