एक्स्प्लोर
Advertisement
मराठवाड्यात 7 लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात आतापर्यंत 35.2 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस 49.2 टक्के हिंगोली जिल्ह्यात पडला आहे. सर्वात कमी पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात 25.5 टक्के एवढा झाला आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात मागील दोन महिन्यांत खरीप हंगामातील केवळ 35.2 टक्के पाऊस पडला आहे. 41 लाख 80 हजार 800 हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पेरणीचा हंगाम संपला असून, अजूनही 7 लाख 30 हजार 99 हेक्टर क्षेत्रात पेरणीच झाली नाही. बीड जिल्ह्याने मागील पंधरवड्यात सर्वाधिक 93.35 टक्के पेरणी झाली आहे.
मराठवाड्यातील पावसाची सद्यस्थिती :
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात आतापर्यंत 35.2 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस 49.2 टक्के हिंगोली जिल्ह्यात पडला आहे. सर्वात कमी पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात 25.5 टक्के एवढा झाला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील पावसाची नोंद खालीलप्रमाणे :
नांदेड - 44.8 टक्के
लातूर - 40.7 टक्के
परभणी -32.1 टक्के
उस्मानाबाद 34.4 टक्के
जालना - 32.8 टक्के
बीड - 29.4 टक्के
मराठावाड्यातील पेरणीची आकडेवारी
मराठवाड्यात 41 लाख 80 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात 13 लाख 53 हजार 100 हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. कपाशीचे एकूण क्षेत्राच्या 3 लाख 64 हजार 300 हेक्टर क्षेत्र अजूनही लागवडीपासून खाली आहे. सोयाबीनची पेरणी एकूण क्षेत्रापैकी 16 लाख 88 हजार 900हेक्टरवर (162.56 टक्के) झाली. मराठवाड्यात कपाशीपेक्षा सोयाबीनची पेरणी अधिक झाली आहे. मूग 95.45 टक्के, मका 85.84 टक्के तर उडदाची पेरणी 80.62 टक्के झाली आहे.
मराठवाड्यातील पेरणीची जिल्हानिहाय टक्केवारी
जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात 63.15 टक्के पेरण्या झाल्या होत्या. मराठवाड्यातील जिल्हानिहाय पेरण्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे :
हिंगोली - 75.52 टक्के
बीड - 92.25 टक्के
नांदेड - 90.63 टक्के
लातूर - 90.35 टक्के
उस्मानाबाद - 87.89 टक्के
औरंगाबाद - 85.41 टक्के
जालना - 79.45 टक्के
परभणीने - 82.48 टक्के
दुबार पेरणीचे संकट
औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांना आता जोरदार पावसाची आवश्यकता असून, येथील काही तालुक्यांत येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही, तर कोरडवाहू शेतीत दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली.
कपाशीचे क्षेत्र घटले!
मराठवाड्यात 17 लाख 17 हजार 400 हेक्टरवर कपाशीची लागवड केली जाते. मात्र, मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेक आणि यंदा मध्यंतरीच्या काळात पावसाने मारलेली दडी, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलीच नाही. त्यामुळे केवळ 13 लाख 53 हजार 109 हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. 15 ऑगस्टपर्यंत बाजरी, तूर, मक्याची मिश्र पेरणी होऊ शकते किंवा शेतकरी रबी ज्वारीची पेरणी करतील अशी अपेक्षा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement