एक्स्प्लोर

500-1000 च्या नोटा रद्द केल्याने नाट्यगृहं-थिएटरही 'व्हेंटिलेटर'वर

मुंबई : 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यामुळे अनेक सर्वसामान्यांनी अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची तक्रार केली आहे. इतर व्यावसायिकांप्रमाणे थिएटर मालकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यभरातल्या जवळपास सर्वच सिनेमागृहात शुकशुकाट पाहायला मिळाला. पाचशे आणि हजाराच्या नोटा तिकीट काऊंटरवर स्वीकारल्या जात नसल्यामुळे काही प्रेक्षकांना माघारी परतावं लागलं. सर्वसाधारणपणे दुपारी 4.30 किंवा रात्री 8.30 वाजता नाटकाचे प्रयोग किंवा संध्याकाळनंतरचे सिनेमांचे शो प्रेक्षकांची गर्दी खेचतात. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'व्हेंटिलेटर' किंवा त्याच्या आधीच्या आठवड्यातले 'ऐ दिल..' आणि 'शिवाय' चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र अचानक आलेल्या या निर्णयामुळे हाऊसफुलचे बोर्ड खाली उतरले. बँक  आणि पोस्ट ऑफिस तुमचं खातं असलेल्या कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत 30 डिसेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेला फॉर्म भरून द्यावा लागेल. केवळ पैसे बदलण्यासाठीच हा फॉर्म भरावा लागेल. तुमच्या खात्यात पैसे भरायचे असतील, तर या फॉर्मची गरज नाही. पैसे बदलण्यासाठी पॅन कार्ड आणि आधारकार्ड किंवा मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे. समजा तुमच्याकडे 500 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 10 हजार रुपये असतील, तर त्यापैकी 4000 रुपयेच एका दिवसात बदलून मिळतील. म्हणजे तुमच्याकडच्या 500 रुपयाच्या 8 नोटाच बँकेत/पोस्टातून एका दिवसात बदलून घेता येऊ शकतील. परत दुसऱ्या दिवशी हीच प्रक्रिया असेल. पण तुम्ही तुमच्या खात्यावर कितीही रक्कम भरू शकता. केवळ बदलून घेण्यासाठीच 4 हजार रुपयांची ही मर्यादा असेल. 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपये तुम्ही बदलून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये वाढ होईल.  पैसे बदलण्यासाठी मर्यादा, मात्र अकाऊंटमध्ये भरण्याला नाही बँकेतून पैसे बदलून घेण्यासाठी मर्यादा आहेत, मात्र तुमच्याकडे 500 किंवा हजार रुपयाच्या कितीही नोटा असतील, तर त्या डिपॉझिट करण्यासाठी किंवा खात्यावर भरण्यासाठी मर्यादा नाही. त्यामुळे तुमच्याकडील सर्व पैसे तुमच्या खात्यावर भरल्यास काहीही अडचण नाही. खात्यावरुन किती पैसे काढू शकाल? तुम्ही तुमच्या खात्यावरील दिवसाला 10 हजार रुपये आणि आठवड्याला 20 हजारपर्यंतची रक्कम काढू शकाल. समजा तुम्ही उद्या 8 हजार रुपये काढले, तर तुम्हाला आठवडाभरात 12 हजार रुपयेच काढता येतील. पण प्रत्येकवेळी तुम्हाला दहा हजारची मर्यादा असेल. (त्यामुळे 12 हजार काढायचे असतील तर दहा हजार निघतील, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन हजार काढावे लागतील) त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा 20 हजार रुपये काढता येतील. ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल. प्रत्येक एटीएमवरुन दिवसाला 2 हजार रुपयांची मर्यादा तुमच्या अकाऊंटवर कितीही रुपये असले तरी एटीएमवरुन तुम्ही दिवसाला एका कार्डवरुन 2 हजार रुपयेच काढू शकाल. 18 नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा असेल. त्यानंतर ही मर्यादा 4 हजारपर्यंत वाढवण्यात येईल. ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल.

संबंधित बातम्या

ज्यांच्याकडे काळा पैसा, त्यांनाच चिंता करण्याची गरज : मुख्यमंत्री

तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल?

नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार

500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला

एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी

टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप

आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक

देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प

कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget