एक्स्प्लोर

एन 95 मास्क सामान्यांनी वापरण्याची गरज नाही : डॉ. रमण गंगाखेडकर

भारत सरकारने पुण्यातल्या एन आय व्ही प्रमाणे इतर सहा ठिकाणीही टेस्टिंग सेंटर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिझल्ट वेगानं उपलब्ध होतील

नवी दिल्ली : एन 95 हा मास्क सामान्य नागरिकांनी वापरण्याची गरज नाही उलट याची जास्त आवश्यकता डॉक्टर आणि नर्सेसला आहे. तसेच लॅबमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे मास्क महत्त्वाचे आहे. मास्कच्या बाबतीत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे  सर्व सामन्यांनी हा मास्क वापरण्याची गरज नसल्याचे मत पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले आहे. एबीपी माझाला दिलेल्या 'कोरोना बद्दल ए टू झेड माहिती.. सोप्या आणि नेमक्या शब्दात' या एक्सक्लुझिव मुलाखतीत ते बोलत होते. डॉ. गंगाखेडकर म्हणाले, मास्क हा कोणी वापरावा हा मोठा प्रश्न आहे. ज्यांना सर्दी, खोकला आहे त्यांनी हे मास्क वापरावे. ज्यांना लागण झाली नाही त्यांनी हा मास्क वापरू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणार असेल तर मास्कची आवश्यकता आहे. एन 95 मास्क गरज नसताना विकत घेतल्याने बाजारात त्याचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. डॉ. रमण गंगाखेडकर हे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख आहेत. देशभरातल्या 14 संस्था त्यांच्या निगराणीत येतात. कोरोना संदर्भात जे लोक भारतात काम करत आहेत त्यापैकी एक डॉ. गंगाखेडकर आहे. Corona Virus | कसं रोखायचं कोरोनाच्या आक्रमणाला? पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची मुलाखत कोरोना व्हायरस हा अजून भारतात इस्टॅ्ब्लीश झालेला नाही. ज्यावेळी देशातल्या देशात तो संक्रमित होईल तेव्हा तो खऱ्या अर्थाने इस्टॅ्ब्लीश झाला असे म्हणता येईल. सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या सवयींमध्ये बदल केला तर कोरोना व्हायरसशी सामना करणे सहज शक्य असल्याचे देखील डॉ. गंगाखेडकर यांनी या वेळी सांगितले आहे. डॉ. गंगाखेडकर म्हणाले, भारत सरकारने पुण्यातल्या एन आय व्ही प्रमाणे इतर सहा ठिकाणीही टेस्टिंग सेंटर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिझल्ट वेगानं उपलब्ध होतील. 31 लॅबसच्या माध्यमातून चाचणी होणार आहे. पुढील काही दिवसात 100 करण्याचा प्रयत्न करणार आहे. संबंधित बातम्या :  Coronavirus | देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 30 वर, दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद देवस्थानांवर कोरोना इफेक्ट, मास्क घातल्याशिवाय त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना नो एण्ट्री, साई, विठ्ठल मंदिरातही स्वच्छतेवर भर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Nasim Khan Security : माझ्यावर हल्ला करण्याचा कट, नसीम खान यांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget