Walmik Karad : चहापेक्षा किटली गरम! बीडमधील लोकनियुक्त आमदारांना अंगरक्षक नाही, पण खंडणीखोर वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन अंगरक्षक
Walmik Karad : वाल्मिक कराडवर तब्बल 26 गुन्ह्यांची नोंद असूनही पोलिस संरक्षणात असल्याने भूवया उंचावल्या आहेत. मात्र, त्याच जिल्ह्यातील लोकनियुक्त आमदारांना सुद्धा अंगरक्षक नाहीत,
Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणात अजून प्रमुख आरोपी फरार असल्याने त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खून प्रकरणातील फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीस यांनी सीआयडीच्या अतिरिक्त महासंचालकांना हे आदेश दिले आहेत. संतोष देशमुख यांचे अपहरण आणि निर्घृण हत्या, पवनचक्की प्रकल्पामध्ये दोन कोटींची खंडणीची मागणी, अॅट्राॅसिटी तसेच पवनचक्की प्रकरणी मारहाण अशा चार प्रकरणातील नऊ आरोपींच्या मुसक्या आवळत खाती गोठवण्यात आली आहेत. कराडच्या एका निकटवर्तीयाला सुद्धा पोलिसांनी उचलले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 21 दिवस उलटले आहेत, पण अजूनही प्रमुख आरोपी फरार आहेत.
वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन अंगरक्षक
दुसरीकडे, बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कृत्ये करत हैदोस घातलेल्या वाल्मिक कराडच्या दिमतीला आता दोन पोलिस असल्याचेही समोर आले आहे. कराडवर तब्बल 26 गुन्ह्यांची नोंद असूनही पोलिस संरक्षणात असल्याने भूवया उंचावल्या आहेत. मात्र, त्याच जिल्ह्यातील लोकनियुक्त आमदारांना सुद्धा अंगरक्षक नाहीत, पण वाल्मिक कराडला असल्याचे दिसून आले आहे. निवडून आलेल्या आमदाराला एखादा पोलीस कर्मचारी अंगरक्षक म्हणून सोबत आहे. मात्र, पोलीस दप्तरी 26 गुन्हे नोंद असलेल्या वाल्मीक कराडला दोन पोलिस अंगरक्षक आहेत. त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपावरून कराड हा पोलिस संरक्षणात उजळ माथ्याने फिरत असल्याचे दिसून येते.
खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यापूर्वी कराडवर 26 गुन्हे नोंद
पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यापूर्वी कराडवर 26 गुन्हे नोंद आहेत. बीड पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेला अहवालामध्ये ही माहिती नमूद आहे. बीड जिल्ह्यामध्ये विद्यमान आमदारांपैकी सुरेश धस, विजयसिंह पंडित, नवीन मुंदडा यांना अंगरक्षक नाहीत. अमरसिंह पंडित, भीमराव धोंडे, प्रकाश सोळंके, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, राम खाडे, बजरंग सोनवणे, मयत सरपंच यांचे भाऊ धनंजय देशमुख, संदीप क्षीरसागर यांना एक पोलिस अंगरक्षक आहे. धनंजय मुंडे, सुभाष राऊत यांना प्रत्येकी दोन अंगरक्षक आहेत.
दुसरीकडे, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढला होता. शनिवारी (28 डिसेंबर) बीडमध्ये विराट मोर्चा काढला. या रॅलीत बडे नेते सहभागी झाले होते. संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्याच लोकांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून त्यांना मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी मोर्चातून करण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या