शिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झालीय, फुंकर मारायची गरज; राजन साळवींच्या जाण्यानंतर भास्कर जाधवांचं वक्तव्य
शिवसेना (Shivsena) ही राख आलेल्या निखाऱ्यासारखी झाली आहे. त्यावर फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आण माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलं.

Bhaskar Jadhav : शिवसेना (Shivsena) ही राख आलेल्या निखाऱ्यासारखी झाली आहे. त्यावर फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आण माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलं. राजन साळवी (Rajan Salvi) गेले म्हणून नाही तर ज्या पद्धतीने चारही बाजूने लचके तोडले जात आहेत, त्यावर चर्चा व्हाव्या लागतात. ती गरज असते असंही भास्कर जाधव म्हणाले. इतर पक्ष आणि शिवसेना यांची विचार करण्याची पद्धत निराळ आहे. शिवसेना पक्ष आदेशावर चालतो. उध्दव ठाकरे जो आदेश देतात त्याप्रमाणे नेते मंडळी पुढे काम करत असतात असे म्हणत भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या विचार पद्धतीवर बोट ठेवले.
कोकणात नव्या दमाची तरुणांची फळी उभी करण्याची गरज
बाळासाहेबांची सहानुभूती संपलेली नाही. त्यांचे विचार आजही सोबत आहेत असे भास्कर जाधव म्हणाले. कोकणात नव्या दमाची तरुणांची फळी उभी करण्याची गरज असल्याचे मत देखील यावेळी भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. याबाबत आमचे वरीष्ठ नेते पक्षाच्या धोरणांबाबत चर्चा करतच असतात. राजन साळवी गेले म्हणजे कोकण गेला असा अर्थ होत नाही, असेही भास्कर जाधव म्हणाले. उदय सामंत हल्ली माझ्याबद्दल चांगल बोलत आहेत. त्यांनी कायम चांगलचं बोलावं असं म्हणत भास्कर जाधव यांनी मंत्री उदय सामंत यांना टोला लगावला.
पक्षाचा एक एक लचका तोडला जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक एक लचका तोडला जात आहे. पक्षाला चारही बाजून घेरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जाधव म्हणाले. यासंदर्बात आमच्या चर्चा सुरु आहेत. आमच्या चर्चा कायम सुरु असतात असे जाधव म्हणाले. आमची चर्चेची पद्धती थोडी वेगळी आहे. आमचा पक्ष आदेशावर चालतो असेही जाधव म्हणाले. पक्षप्रमुख हे आमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत असतात असेही जाधव म्हणाले. साळवी गेले म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गेला असे नाही, असेही जाधव म्हणाले.
बाळासाहेबांनी शिवसेना उभी करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं
बाळासाहेबांनी शिवसेना उभी करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. तसेच अनेकांनी प्राण देखील पणाला लावल्याचे भास्कर जाधव म्हणाले. आजही बाळासाहेबांची पुण्याई संपलेली नाही. त्यांनी दिलेले विचार संपलेले नाहीत. त्यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसाला दिलेला आधार दिल्याचे भास्कर जाधव म्हणाले. ते आज रत्नागिरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
Eknath Shinde : देर आए दुरुस्त आए... राजन साळवी आज खऱ्या शिवसेनेत सामील झाले; एकनाथ शिंदे काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
