एक्स्प्लोर
चिमुकलीवर शारीरिक अत्याचार, मालेगावात जाळपोळ आणि दगडफेक
मालेगाव : मालेगावमध्ये आशानगर भागात सहा वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या शारीरिक अत्याचाराच्या घटनेचे पडसाद आज पाहायला मिळत आहेत. मालेगावकर आज रस्त्यावर उतरले. जमावाने दुकानं आणि रस्त्यांवरील वाहनांवर दगडफेक केली.
यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले खरे, पण जमावाला शांत करण्यात त्यांना अपयश आलं. जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलिस जखमी झाले आहे. तसंच पोलिसांची दोन वाहनं जमावाने पेटवून दिली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.
दरम्यान, जमावाने आजूबाजूच्या शाळांचंही मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलिस बळ मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement