एक्स्प्लोर

कोरोनामुळे 'देऊळबंद', कोकणातल्या पर्यटनावर परिणाम; वर्षभराचं आर्थिक गणित कोलमडलं!

कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून त्याचा परिणाम हा व्यवसायावर होत आहे. कायम गजबजलेल्या समुद्रीकिनारी सध्या हाताचा बोटावर मोजता येतील एवढेच पर्यटक आहेत. परिणामी वर्षभराचं आर्थिक गणित देखील कोलमडलं आहे.

रत्नागिरी : शांत आणि निर्मनुष्य रस्ते आणि सर्वत्र असणारा शुकशुकाट. हे सारं चित्र आहे निसर्ग सौदर्याने नटलेल्या आणि कायम गजबजलेल्या कोकणातील. या साऱ्याला कारणीभूत आहे तो कोरोना व्हायरस. कोरोनामुळे सध्या सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. शिवाय गणपतीपुळे आणि पावससारखी मंदिरं देखील पुढील निर्णय येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून त्याचा परिणाम हा व्यवसायावर होताना दिसून येत आहे. कायम गजबजलेल्या समुद्री किनारी सध्या हाताचा बोटावर मोजता येतील एवढेच पर्यटक आहेत. मोठ्या व्यवसायिकांपासून ते छोट्या व्यवसायिकांवर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आता वर्षभराचं आर्थिक गणित देखील कोलमडलं आहे. आता आम्ही कामगारांचे पगार तरी कसे द्यायचे? धंदाच नाही तर, तरणार तरी कसे? असा सवाल देखील सध्या व्यवसायिक देखील विचारत आहेत. त्यामुळे कोरोनाचं हे संकट आता आर्थिक गोष्टींवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम करताना दिसत आहे.

काय आहे सध्याची स्थिती? राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी गणपतीपुळ्यातील मंदिर मात्र बंद नव्हतं. पण, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंदिर प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर पावस आणि गणपतीपुळे येथील मंदिर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, त्यानंतर आता भाविकांची पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम हा छोट्या मोठ्या व्यवसायिकांवर झाला आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका हा सर्वच व्यवसायिकांना बसताना दिसत आहे. दरम्यान, मंदिर केव्हा सुरू होणार किंवा परिस्थिती केव्हा पूर्वपदावर येईल याबाबत कोणतीही माहिती नसल्याने यातून सावरायचं तरी कसं? असा प्रश्न देखील पडला आहे.

सर्वत्र शांतता कोकण कायम गजबजलेलं असायचं. पर्यटकांची संख्या आणि राबता देखील तितकाच मोठ्या प्रमाणावर दिसून येत असे. पण, सध्या मात्र सर्वत्र शांतता दिसून येत आहे. शिवाय, रेल्वे स्टेशन्स, बस स्थानक याठिकाणी देखील प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget