Board Exams : नागपुरात बारावीचा वर्गच नसलेल्या शाळेत शिक्षिकेची 'प्रॅक्टिकल' परीक्षेसाठी ड्युटी; बोर्डाचा सावळागोंधळ उघड
प्रात्यक्षिक परीक्षेत यंदा एका शाळेत बारावीचा वर्गच नसताना रसायनशास्त्राच्या शिक्षिकेला त्या शाळेत पाठविण्याचे पत्र बोर्डाकडून आले. आमच्याकडे बारावीच नसल्याचे प्राचार्यांनी सांगितल्याने शिक्षिकेला धक्काच बसला.
Board Exams News : राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे 20 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान काही शिक्षकांना ज्या शाळेत बारावीचे वर्गच नाहीत अशा शाळांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पाठविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातून बोर्डाचा सावळागोंधळ उघडकीस आला आहे.
बारावीच्या परीक्षा 21 तारखेपासून सुरू होत आहे. यावर्षी 1 लाख 55 हजारावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यापैकी विज्ञान आणि एमसीव्हीसीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक घेण्यात येतात. त्यामध्ये एकट्या विज्ञान शाखेत 75 हजार 882 विद्यार्थी असून एमसीव्हीसीत 6 हजार 150 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 1 तारखेपासून सुरू झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षेत यंदा एका शाळेत चक्क बारावीचा वर्गच नसताना एका रसायनशास्त्राच्या शिक्षिकेला त्या शाळेत पाठविण्याचे पत्र बोर्डाकडून आले. दरम्यान, शाळा ओळखीची असल्याने त्या शाळेतील एका शिक्षिकेने प्राचार्यांशी संपर्क केला. प्राचार्यांनी आमच्याकडे बारावीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे शिक्षकही अवाक् झाले. दुसरीकडे बऱ्याच शाळांमध्ये ज्या शिक्षकाचा विषय नाही, त्यांना त्याच विषयाच्या प्रात्यक्षिकासाठी पाठविण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक घ्यायचे कसे? हा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला.
याबाबत बोर्डाकडे विचारणा केली असता, त्यांनी यादीत चूक झाल्यामुळे ही बाब झाली असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष वंजारी यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याद्या अपडेट नाहीत. बोर्डाकडून प्रत्येक वर्षी पॅनल बोलावलं जातं. मात्र, ज्यांच्याकडून नाव येत नाही, त्या विषयासाठी बोर्डाच्या यादीतून नावे देण्यात येतात. मात्र, त्या याद्या दरवर्षी अपडेट होत नसल्याचे चित्र दिसून येते. त्यातून हा घोळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
'प्रॉक्टिकल' परीक्षेसाठी शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया
विशेष म्हणजे, बोर्डाकडून प्रात्यक्षिक परीक्षेत बहि:शाल शिक्षकांसाठी शाळांमार्फत विविध विषयांचे पॅनल मागविण्यात येते. त्यानंतर आलेल्या नावांची निवड करीत, एक यादी करण्यात येते. त्यानंतर विविध शाळांमध्ये प्रात्यक्षिक घेण्यासाठी हे शिक्षक जात असतात. मात्र, असे होत असले तरी अनेकदा शाळांमधून शिक्षकांचे पॅनल पाठविण्यात येत नाही. त्यामुळे बोर्डाकडे असलेल्या यादीतील शिक्षकांना पत्र पाठवून त्यांना प्रात्यक्षिक घेण्यासाठी जाण्याचे आदेश देण्यात येतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nagpur : नागपुरातील बर्डी उड्डाणपुलावर भरधाव कारची टाटा एसला धडक; 4 महिलांसह 9 जखमी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI