जाड आहेस म्हणत भावी पतीकडून टोमणे, तरुणीची आत्महत्या; जळगावमधील धक्कादायक घटना
Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यतील कुऱ्हे गावात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.
Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यतील कुऱ्हे गावात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. विवाह निश्चित झाल्यानंतर होणाऱ्या पतीने जाड आहेस, अशा प्रकारे हिणवले, शिवाय दागिन्यांसाठी पैशांची मागणी केल्याच्या मानसिक त्रासातून तरुणीने विवाहापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामेश्वरी नागपूरे असे या तरुणीचे नाव आहे. या घटनेनंतर कुऱ्हे गावात खळबळ उडाली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हे गावातील रवी नागपूरे यांची कन्या रामेश्वरी हीचा नुकताच विवाह निश्चित होऊन साखरपुडा करण्यात आला होता. आपल्या भावी जोडीदाराच्या सोबत आनंदी जीवन जगण्याची स्वप्न पाहत असतानाच विवाहनंतर पतीसह सासरच्या लोकांचे खरे रूप रामेश्वरीला दिसून आले. ज्यामुळे ती चांगलीच खचली होती. अगोदरच विवाह निश्चित होऊन साखरपुडा ही झाल्याने लग्न मोडलं, तर आपल्या आई वडीलांना मोठ दुःख होईल, म्हणून ती आपल्या मनातील दुःख कोणाला सांगू ही शकत नव्हती. ''तू जाड आहेस, मला आवडत नाही'', अशा प्रकारचे टोमणे भावी पतीकडून ऐकल्या नंतर ती जास्त खचली होती.
एकीकडे पतीची हिणवणी तर दुसरीकडे सासूकडून विवाहसाठी दागिन्यांची मागणी, या दोन्ही मानसिक त्रास होईल, अशा गोष्टींमुळे रामेश्वरीने शनिवारी गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं, असं बोललं जात आहे. या घटनेने मात्र रामेश्वरीचे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पतीसह सासरच्या लोकांनी लग्नाआधीच तिला दिलेल्या मानसिक त्रासामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनी होणाऱ्या पती आणि सासरच्या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आता पोलिसांकडे केली आहे. या घटनेत सखोल चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Online Games : ऑनलाइन गेम्समधून होणाऱ्या फसवणुकीला बसणार चाप! राज्य सरकारकडून लवकरच कायद्यात मोठे बदल?
- तुमची मुलं ऑनलाईन गेम्स खेळतायत? हॅकर्सने लुटले सव्वा तीन लाख रुपये, गेमिंगद्वारे फसवणूक
- FIR filed against Vaibhav Gehlot: राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, फसवणूक केल्याचा आरोप