एक्स्प्लोर

तासगाव बसस्थानकात अडकलेल्या 23 मुलींची पोलीसांकडून सुटका; नागरिकांमधून होतंय कौतुक

शेवटची बसही निघून गेल्याने बसस्थानकात 23 मुली अडकून पडल्या होत्या. त्यांची अडचण पाहून तासगाव पोलीसांनी त्यांना सुखरुप घरपोच केले.

सांगली : बस निघून गेल्याने रात्रीच्या वेळेस बसस्थानकात अडकलेल्या 23 मुलींना तासगाव पोलीसांनी सुखरुप घरी पोचवले. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशातील मुली, महिला सुरक्षित नसल्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या मुलींचा मदत केल्याने तासगाव पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तासगाव बसस्थानकातुन शेवटीची बस निघून गेल्याने 23 मुली बसस्थानकातच अडकून पडल्या. तासगाव तालुक्यातील शिरगाव, बोरगाव आणि निंबळकर या गावच्या 23 मुली घरी कसं जायच या विचारान भेदरल्या होत्या. ही बाब पोलीसांच्या लक्षात आली आणि पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी कैद्यांना नेणारी मोठी गाडी तासगाव बस स्थानकात आणत मुलींना गाडीत बसा घरी सोडतो असे सांगितले. घरी जायला काही नसल्याने पोरी दबकत दबकत गाडीत बसल्या व पोलिसांनी अगदी व्यवस्थित त्यांना घरापर्यंत पोहचवलं. अजून सहा दिवस या मुलींचे पेपर असल्याने पोलिस दररोज त्यांना घरी सोडणार असल्याचे गोपनीय विभागाचे मोहन वंडे यांनी सांगितले. पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी तोंडभरुन कौतुक केले. 'त्या' घटनेनंतर अनेक ठिकाणी पोलीसांकडून मुलींना विशेष मदत हैदराबाद येथे महिला पशु वैद्यकीय डॉक्टरचा बलात्कार आणि नंतर हत्या करुन जाळून टाकल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली. सोबतच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पोलीसांनी मुलींना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी मदत केंद्र, पथकाची स्थापना केली आहे. बीड पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी 'कवच' या नावाने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. यात मदतीसाठीचे फोन नंबर दिले आहेत. या अभियानांतर्गत रात्रीच्या वेळी एखाद्या महिलेला किंवा मुलीला असुरक्षित वाटल्यास पोलीसांना संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एबीपी माझाने या उपक्रमाची रिअॅलीटी चेक केली असता यात बीड पोलिस पास झाले आहेत. निर्भया पथक, सारथी - नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीही महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलात निर्भया पथकाची स्थापना केली आहे. याअंतर्गत कोणत्याही ठिकाणी मुलगी अथावा महिलांना फोन केल्यानंतर काही वेळातच मदत दिली जाणार आहे. तर, रात्रीच्या वेळी अडचणीत सापडलेल्या मुली, महिलांच्या मदतीसाठी 'सारथी' नावाचा नवीन उपक्रम पोलीस प्रशासनाने सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत संकटात असलेल्या महिलांना पोलिसांचे 'सारथी' वाहन तातडीने घटनास्थळी जाऊन मदत करणार आहे. रात्री घरी जाण्यास उशीर झाल्यास संबंधित मुलीला तिच्या घरी नेऊन सोडण्याचेही काम करणार आहे. हेही वाचा - महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी बीड पोलिसांचं कवच, 'माझा'च्या रिअॅलिटी चेकमध्ये पोलिस पास Special Report | 'ऑपरेशन कवच', महिलांच्या सुरक्षिततेसाठी बीड पोलिसांची तत्पर हेल्पलाईन | ABP MAJHA

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget